Home सांस्कृतिक ज्ञानदेवांचे विचार जगात पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार :-   विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा… ...

ज्ञानदेवांचे विचार जगात पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार :-   विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा… — श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांचा सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

          संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा प्रसार विविध माध्यमांद्वारे जगात करणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीचे विविध भाषांमध्ये अनुवाद करणे उपयुक्त ठरेल. ऑनलाइन प्लॅटफॉर्म, सामाजिक माध्यम आणि शिक्षण संस्था यांसारख्या साधनांचा वापर करून त्यांचे विचार जागतिक स्तरावर पोहोचवता येतील.

         श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत चालणाऱ्या “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या संस्कारक्षम उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानदेवांचे विचार जगातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आळंदी देवस्थानचे नवनिर्वाचित विश्वस्त हभप चैतन्य महाराज लोंढे (कबीरबुवा) व्यक्त केले.

         श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी हभप चैतन्य महाराज कबीरबुवा, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील व ॲड.रोहिणी पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल सन्मानसोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, विश्वस्त दिपक पाटील, लक्ष्मण घुंडरे, नंदकुमार कुऱ्हाडे, संजय घुंडरे, विलास घुंडरे, श्रीधर कुऱ्हाडे, आनंद मुंगसे, साहेबराव कुऱ्हाडे, प्राचार्य सुर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

         ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी नवनिर्वाचित विश्वस्तांचा व संस्थेच्या ऋणानुबंधाबद्दल माहीती दिली. आळंदी देवस्थानचे ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेस कायम सहकार्य असते. ओळख ज्ञानेश्वरी हा शालेय विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम आळंदी देवस्थानमुळे राज्यभर पोहचविण्यासाठी मदत झाली आहे. नवनिर्वाचित विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील व ॲड.रोहिणी पवार यांनीसुद्धा मनोगतातून ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.