सत्यवान रामटेके आजपासुन आमरण उपोषण करणार…

 

ऋषी सहारे

संपादक

     गडचिरोली _ वन विभाग कार्यालय वडसा स्थित सामाजीक वनीकरण विभागाचे वन संरक्षक यांनी शासनाने सांगितलेल्या 33 करोड वृक्षारोपणात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्या प्रकरणी सामाजीक कार्यकर्ते सत्यवान रामटेके कोंढाळा हे आज दि . २ मे पासून तहसिल कार्यालय वडसा येथील सामाजीक वनीकरण विभागाच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. तस्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली ‘ मुख्य उपवन संरक्षक गडचिरोली ‘तहसिलदार वडसा ‘ पोलिस स्टेशन वडसा आदिनी दिलेले आहे. सदर उपोषणाला रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर ‘ कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर यांनी पांठिबा दर्शविला आहे.