डॉ.अभिलाषा बेहेरे – गावतुरे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश.

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादिका 

मूल :-

सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे व डॉ. राकेश गावतुरे यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक वाढई तसेच सचिव विक्रम गुरनुले हे उपस्थित होते.

          ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार हे लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रपूर क्षेत्राचत भाजपाचे उमेदवार आहेत तसेच आ. प्रतिभाताई सुरेश धानोरकर या काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत.अनेक पक्षाचे तसेच काँग्रेस पक्षातील अनेक बड्या नेत्यांचा भाजप पक्ष प्रवेश सुरु असताना आता घेतले.

          कांग्रेस प्रदेश्याधक्ष नानाभाऊ पटोले यांनी चंद्रपुरातील बहुजन चळवळीच्या व सामाजिक क्षेत्रातील सर्वमान्य नेतृत्व डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना काँग्रेस पक्षात सामावून घेतल्याने कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना मोठे बळ मिळालाल्याचे बोलले जात आहे. 

           गावतुरे दाम्पत्यांचे गेल्या पंधरा वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या बहुजन चळवळीमध्ये तसेच ओबीसी चळवळीमध्ये मोठे योगदान आहे. 2020 च्या संविधान दिनी निघालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओबीसी मोर्चाचे नेतृत्व केले.

          आरोग्य क्षेत्रामध्ये कोरोना काळामध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिलेली निस्वार्थ सेवा याची दखल तर केवळ महाराष्ट्र नाही तर राष्ट्रीय मीडियाने सुद्धा घेतली होती.

        त्यांच्या भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन असो कामगारांचा हक्काचा लढा असो वा गाव तिथे वाचनालय ही मोहीम असो ,महिला सक्षमीकरणाची चळवळ असो ,चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य शिबीराच्या मार्फत रुग्णांना आरोग्य सेवा देणे, तसेच बाल रोग तज्ञांच्या संघटनेचे सचिव असताना कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांचा मोफत उपचार आणि संगोपन करण्याचे मोठे कार्य असो, वन्यजीव प्राण्यांच्या संघर्षांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा प्रश्न उचलून धरणे, आदिवासींच्या हक्काच्या लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे या मुळे जिल्हाभरातील विशेष करून बल्लारपूर मुल विधानसभेमधून त्यांचा मोठा कार्यकर्ता वर्ग निर्माण झालेला आहे.

 डॉ.राकेश गावतुरे यांचे वडील हे काँग्रेस सेवा दलाचे आजीवन सदस्य आहेत त्यामुळे डॉ.राकेश गावतुरे यांना सामाजिक बांधिलकीचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने ते काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधान वाचवण्याच्या लढाईत अग्रणी शिलेदाराच्या भूमिकेत असतील याची चर्चा समाजातील सर्व स्तरातून होत आहे.

         या बातमी मुळे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस मध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे. गावतुरे दाम्पत्याच्या काँग्रेस प्रवेशाने चंद्रपूर लोकसभेतील समीकरणे नक्कीच बदलतील अशी काँग्रेस कार्यकर्त्यांना आशा आहे. आमच्या प्रवक्याशी बोलताना डॉ गावतुरे म्हणाल्या की आम्ही साविधांनाच्या रक्षणार्थ काँग्रेसच्या समर्थनार्थ लोकशाही वाचविण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरलो आहोत आणि विजय नक्की सत्याचा होईल.