पुनम प्रकरणात एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चिमूर ठाणेदारांसोबत सविस्तर चर्चा.. — अत्याचारी व जातीयवादी तुषार बगडेसह त्याच्या आई-वडिलांचा पोलीस घेत आहेत शोध.. — दुसऱ्यांदा बोवल्यावर चढायच्या आतच करणार अटक..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

             वृत्त संपादीका

         श्री.तुषार मारोती बगडे म्हणजे पत्नीला भुलथापा देत अत्याचार करणारा जातीयवादी शोषणकर्ता.तद्वतच स्वत:चे पाप झाकण्यासाठी पत्नी पुनमचे चारित्र्य हनन करणारा दृष्ट बुध्दीचा व अमानवीय कृतीचा लायक नसलेला व्यक्ती.

         या दृष्ट व पत्नीला कलंकित करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पोलीस स्टेशन चिमूर येथे,भांदवी कलम ४९८(अ),३२३,५०६,५०४,परत भांदवी कलम ५०६,५०४,अंतर्गत गुन्हा दाखल असून तो चिमूर पोलिसांना नेहमी गुंगारा देतो आहे.

          आता तर तुषार बगडेसह त्याच्या जातीयवादी आई-वडिलांनी कमालच केली,तुषारला पहिली पत्नी असताना त्याचे दुसरे लग्न चिमूर तालुक्यातील मौजा रामपूर येथील रहिवासी असलेल्या कुमारी सेजल अशोक गुळधे या मुलीसोबत जोडले आहे व १८ एप्रिल २०२४ ला तो नेरी येथे गुरुदेव शेवा मंडळाच्या सभागृहात बोवल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे.

          पहिली पत्नी बौध्द समाजाची असून तो हिंदू धर्मातील आहे.त्याच्या आई-वडिलांना बौध्द समाजाची सुन मान्य नसल्याने त्याने पहिल्या पत्नीला म्हणजेच पुनमला हर प्रकारे त्रास दिला आहे,तिची प्रताळणा केली आहे,जातीच्या नावाखाली तिची वारंवार मानहानी केली आहे.

     तद्वतच पुनम चारित्र्यवान असताना ती बौद्ध समाजाची असल्याने तिचे समाज मनात जाणिवपूर्वक चारित्र्यहनन केले जात असल्याचे गंभीर प्रकरण आहे.

         एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके,चिमूर तालुका महासचिव शिध्दार्थ चहांदे यांनी अत्याचारग्रस्त पुनमची प्रत्यक्ष तिच्या आईच्या घरी भेट घेऊन सर्व परिस्थिती गांभीर्याने जाणून घेतली.

          आणि सदर प्रकरणाबाबत चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार बकाल यांचे सोबत चर्चा करुन प्रकरणाचे गांभीर्य अवगत केले आणि अत्याचारग्रस्त व पिडित पुनमला कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असी विनंती केली.

         चिमूर पोलिस तुषार बगडेसह त्यांच्या जातियवादी आई-वडिलांच्या मागावर असून सदर गंभीर प्रकरणाबाबत तुषार बगडेसह त्याच्या जातीयवादी आई-वडिलांवर परत गुन्हे दाखल होऊ शकतात एवढे भयावह गंभीर प्रकरण आहे.

पूनमने दिलेले कागदपत्र खालीलप्रमाणे