बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
गोंदी तालुका इंदापूर येथील पावन भूमीत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
सप्ताहभर गावात हरिनामाचा गजर, अभंग-भजन, प्रवचन आणि कीर्तनांचा कार्यक्रम सुरू होता. वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांनी कीर्तनातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ उलगडून सांगत श्रीकृष्ण चरित्र आधारे गोकुळातील गवळणी ची भक्ती, नामस्मरण आणि सदाचाराचा संदेश दिला. परमार्थ करा आई-वडिलांची सेवा करा म्हणजे परमेश्वराची भेट होईल.
श्री गुरु सोहम महाराज देहुकर हे कीर्तन सेवे प्रसंगी बोलत होते.काल्याच्या कीर्तनावेळी डांगे वस्ती परिसरात टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात वातावरण भारावून गेले होते. संपूर्ण गावातून ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, च्या जयघोषश दिंडी फेरी प्रदक्षिणा करीत भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात सर्वांना वाटपही करण्यात आले.
या सप्ताहामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संत साहित्याची शिकवण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
नरसिंहपूर, टणु , संगम , गिरवी , टाकळी, गार आकुले , ओझरे , गोंदी , सराटी ,बावडा, अकलूज, गणेशगाव ,बाभळगाव ,खळवे , शेवरे ,टेंभुर्णी, आधी सर्व भागातून टाळकरी विणेकरी मृदुंग वादक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



