जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन ….. — हिट अँड रन कायदा रद्द कराण्याची प्रमुख मागणी..

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी..

               तालुक्यातील चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्ग वर आज सकाळी 8 वाजता   

हिट अँड रन हा कायदा रद्द करावा या प्रमुख मागणी साठी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,आंदोलना दरम्यान शेकडो चालक-मालकाची उपस्थिती होती.

              अपघात घडल्यास जखमींना मृत्युच्या दारी सोडून पडुन जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही.परंतु स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जन्मजात असल्या कारणाने आणि आपल्या भारत देशामध्ये दलीत आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे तशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जीवाच्या भितीने अपघात स्थळावरून पळुन जातो.

                 हे लक्षात घेता ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमतः अमलबजावणी करणे आणि त्यानंतर हिट अँड रन या नविन कायद्यामध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड कमी करून त्यानंतरच कायदा लागू करावे अशी मागणी आहे.

          सदर कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आज दिनांक ०२/०१/२०२४ रोजी रस्ता रोको आंदोलन हिरापूर येथे सकाळी आठ वाजता राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आले,यावेळी 

निवेदन देण्यात आले. 

              याआंदोलनात सुधिर टोंगे महाराष्ट्र प्रदेश प्रसार प्रचार प्रमुख,उमेश आजबले चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष रवि झरकर चंद्रपुर जिल्हा सहकोषाध्यक्ष,राजु देशमुख सावली तालुका अध्यक्ष,निलेश वद्देलवार सावली तालुका उपाध्यक्ष,हरी कातलवार सावली तालुका सचिव, सुरज देऊरघरे,एकनाथ ठाकुर,योगेश मोहुर्ले,रोशन मेरुगवार,अमित भोपये,प्रज्वल कोतपल्लीवार,संतोष कस्तुरे,शुभम लेणगुरे,रजनिकांत सोनवाणे,सागर कामटकर,प्रकाश गेडाम,अक्षय शेन्डे, संजय गेडाम,वशीम शेख,मिथुन चौधरी,अमित भोपये,धनराज तुमराम,मयुर बोदलकर,राहुल चौधरी,जयत नागोसे,अरविद सोनवणे,मनोज खनके,रोशन वालदे,नितेश उरकुडे यांच्या सह पन्नास साठ चालक मालक तालुकातील पदाधिकारी सदस्य उपस्थित होते ….