हिट अँड रन कायदा रद्द करा… – चिमूर तालुक्यातील चालक-मालकांची मागणी.. — एकीचे बळ..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका

           डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने तिन कायद्यांतर्गत लोकसभा व राज्यसभेत बिल मंजूर केले.या तिन्ही कायद्यांतर्गत विधेयकांवर राष्ट्रपतीं महामहीम द्रौपदी मुर्मू यांची मोहर लागली आहे.

            यामुळे सदर बिलाचे रुपांतर कायद्यात झाले आहे.चलकांसाठी अंमलात आलेला नवीन कायदा हा जुलमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर देशभरातील चालकांनी व चालक-मालकांनी वाहतूक सेवा बाबत बंद पुकारुन वाहतूक कोंडी केली आहे.

        देशभरात ट्रान्सपोर्ट व इतर वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आल्याने चिमूर तालुक्यातील चालक-मालक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी चिमूर तालुक्यातंर्गत व चिमूर तालुका बाह्य दळणवळण सेवा बंद ठेवली आहे.

       याचबरोबर हा जुलमी कायदा रद्द करण्यासाठी आज हुतात्मा स्मारक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय चिमूर पर्यंत निषेध मोर्चा काढला.

          निषेध मोर्चा नंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा, परिवहन मंत्री केंद्र सरकार,राज्य सरकार,यांना निवेदन पाठविण्यात आले व सदर कायदा रद्द करण्याची मागणी रेटून धरण्यात आली.

              चिमूर तालुक्यासह देशभरातील चालकांनी वाहतूक सेवा ठप्प केल्यामुळे देशातील भांडवलदारांची,इतर लघु व्यवसायीकांची,केंद्र सरकारची तारांबळ उडाली असून त्यांची पुरती कोंडी झाली आहे.