भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
रांगी पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आरमोरी रोडवर नाळेवाही नाल्याच्या पुढे नर्सरी जवळ दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोज शनिवारला सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त,उत्तर प्रदेशातिल रहिवासी असलेले पण सध्या आरमोरी येथे वास्तव्यास असलेले दोन्ही व्यक्ती दुचाकी क्रमांक (MH-36P1311)आरमोरी वरुन धानोरा येथे जात असताना नाळेवाही नाल्या पुर्वी वनविभागाच्या नर्सरी समोर दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी लोखंडी रॉड आपटून झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले.
जखमी झालेल्या इसमाचे नाव एकाचे हसमत अली शाह वय 30वर्षे तर दुसर्या व्यक्तिचे अब्दुल कलाम शाह 17 वर्षे अशी आहे.जखमी दोन्ही व्यक्तीना उपचारासाठी रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन उपचार करन्यात आले. मात्र गाडी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



