Home देशविदेश नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत उमेदवार निवडताना मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या भुलथापांना बळी पडू नये…...

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत उमेदवार निवडताना मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या भुलथापांना बळी पडू नये… — वंचितचे सर्वेसर्वा म्हणतात ओबीसींना आरक्षण वाचवायचे असेल तर भाजपला दूर केले पाहिजे… — मनसे प्रमुख म्हणतात तुमच्या शाळा आणि जमीनी वाचवायच्या असतील तर भाजपला सत्तेत येवू देऊ नये… — सत्ता कशासाठी असते हे भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांना अजूनही समजले नाही? याचबरोबर लोकप्रतिनिधीं कसा असतोय आणि कशासाठी असतोय हे सुद्धा त्यांना अजूनही कळले नाही.

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

          कोणत्याही प्रकारची सत्ता ही जातीभेद व धर्मभेद न करता लोकविकासासाठी आणि महाराष्ट्र राज्यासह भारत देशातील सर्व पुरुषांचे/सर्व महिलांचे/सर्व युवकांचे/सर्व बेरोजगारांचे/सर्व शेतकऱ्यांचे/सर्व विद्यार्थ्यांचे/सर्व युवतींचे व सर्व बालबालींकांचे संरक्षण करण्यासाठी असते.

            याचबरोबर देशातील सर्व पुरुष-महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सत्ता असते.त्यांची उन्नती करण्यासाठी सत्ता असते,विषमतावाद नष्ट करण्यासाठी सत्ता असते.शेतकऱ्यांसह,विद्यार्थ्यांच्या,युवकांच्या,बेरोजगारांच्या,महिलांच्या,मजूरांच्या समस्या निकाली काढण्यासाठी सत्ता असते.देशातील सर्व लहान-मोठ्या नागरिकांचा व महिलांचा आदर करण्यासाठी सत्ता असते.

          कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी किंवा सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी, शेतकऱ्यांची व देशातील सर्व नागरिकांची,महिलांची, बेरोजगारांची,युवकांची, विद्यार्थ्यांची,युवतींची,मजूरांची, थट्टा करु नये,त्यांना अपमानास्पद बोलू नये,त्यांची कोंडी करु नये,त्यांची अयोग्य कार्यपद्धतीने गळचेपी करु नये,यासाठी सत्ता असते.

           यामुळेच वंचितचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला इशारा दिला आहे की तुम्हाला तुमचे आरक्षण वाचवायचे असेल,अधिकार वाचवायचे असतील तर तुम्ही भाजपाला नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत पराभूत केले पाहिजे.

      आरक्षण म्हणजे ओबीसी समाजाची सर्व प्रकारची उन्नती आहे.यामुळे त्यांचे आरक्षण वाचवायचे त्यांचीच जबाबदारी आहे,हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकरांनी ओळखले आहे.म्हणूनच त्यांनी ओबीसी समाजाला आव्हान करतांना भाजपावर आंधळा विश्वास ठेवू नका हे प्रामुख्याने लक्षात आणून दिले आहे.

           याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ओळखले आहे की,भाजपाच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या हातात नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सत्ता गेल्यात तर ते शासकीय शाळा बंद करण्यास मान्यता देतील आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित करतील.

          तद्वतच नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील जागा हे भांडवलदार म्हणजे उद्योगपती गौतम अडाणी,मुकेश अंबानी यांना विनामूल्य देण्यासाठी मनमानी तथा अंधाधुंद कारभार करतील असे आवर्जून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदारांना सांगितले आहे.

          सरकारी शाळा या गोरगरिब विद्यार्थ्यांचा श्वास व प्राण आहे.हा श्वास बंद करण्याचा विडा भाजपा व त्यांच्या मित्र पक्षांनी उचलला आहे.यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे भाजपा व त्यांच्या सहकाऱ्यांना नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूकीत हरविले पाहिजे.

           लोकप्रतिनिधीची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे जनतेच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करणे होय.त्यांच्यात (लोकप्रतिनिधींत) जनतेप्रती संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे.याचबरोबर कायदे बनवतांना किंवा ठराव घेतांना नागरिकांचे/महिलांचे आणि इतर कुणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेणारे लोकप्रतिनिधी असावेत ही खरी लोकशाहीची धारणा आहे.

            लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या,गरजा आणि अपेक्षा संसदेत किंवा विधानसभेत,महानगरपालिकेत, जिल्हा परिषदेत,पंचायत समिती मध्ये,नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये मांडणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य आहे.

        जनतेशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी उत्कृष्ट संवाद कौशल्ये लोकप्रतिनिधींमध्ये असणे महत्त्वाचे आहे.

       तद्वतच जनतेच्या हितासाठी योग्य कायदे तयार करणे आणि त्या प्रक्रियेत भाग घेणे अपेक्षित आहे.शासनाच्या कारभारात सक्रियपणे सहभागी होऊन निर्णय प्रक्रियेचा भाग बनणे,हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य लोकप्रतिनिधींचे आहे.लोकप्रतिनिधींनी नैतिक आचरण आणि सचोटीचे पालन करणे आवश्यक आहे,जेणेकरून निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता राखली जाईल.

          याचबरोबर लोकप्रतिनिधींना त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल आणि जनतेच्या हितासाठी असलेल्या कामाबद्दल जबाबदार असावे लागते.

        “लोकप्रतिनिधी स्थानिक असावा.त्याला विकासाची दृष्टी व समाजकार्याची जाण असावी.त्याच बरोबर तो सुशिक्षित,समजदार,हुशार,कायद्याचे ज्ञान आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हवा.लोकांचे प्रतिनिधित्व करणारा असावा,लोकांचे काम करणारा असावा,गटबाजी करणारा नसावा,आणि जरी लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्राच्या विकासावर लक्ष दिले तरी देशाची प्रगती होईल असा खरा लोकप्रतिनिधी असावा.

             एका चांगल्या लोकप्रतिनिधीमध्ये अनेक गुण आणि क्षमता असणे आवश्यक आहे,ज्यामुळे तो आपल्या मतदारांचे योग्य प्रतिनिधित्व करू शकेल आणि त्यांच्या हिताचे रक्षण करू शकेल.

लोकप्रतिनिधींचे गुण खालीलप्रमाणे….

1. प्रामाणिकपणा आणि नैतिकता.

        लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक असणे अत्यंत आवश्यक आहे.त्यांनी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे आणि कोणत्याही भ्रष्ट मार्गांचा अवलंब करू नये.त्यांच्यामध्ये उच्च नैतिक मूल्ये असायला हवी,ज्यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकतील.

2. जनतेशी संपर्क…

       लोकप्रतिनिधींनी नियमितपणे जनतेच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.त्यांच्या समस्या आणि गरजा समजून घेणे महत्त्वाचे आहे.जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी सभा,बैठका आणि चर्चासत्रे आयोजित करावीत.

  3. सक्षम नेतृत्व…

        लोकप्रतिनिधींमध्ये नेतृत्व क्षमता असणे आवश्यक आहे.त्यांनी आपल्या समर्थकांना आणि सहकाऱ्यांसोबत मिळून काम केले पाहिजे.ध्येय साध्य करण्यासाठी योग्य योजना बनवण्याची आणि अंमलात आणण्याची क्षमता त्यांच्यात असावी.

4. कायद्याचे ज्ञान…

        लोकप्रतिनिधींना देशाच्या कायद्याचे आणि नियमांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.कायद्याच्या चौकटीत राहूनच त्यांनी आपले कार्य केले पाहिजे.

5. प्रभावी संवाद कौशल्ये…

          लोकप्रतिनिधींमध्ये प्रभावी संवाद कौशल्ये असणे आवश्यक आहे.त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडता आले पाहिजे.जनतेला आकर्षित करण्याची आणि आपले म्हणणे पटवून देण्याची क्षमता त्यांच्यात असावी.

6. सामाजिक बांधिलकी…

          लोकप्रतिनिधींमध्ये समाजाप्रती बांधिलकी असावी.त्यांनी समाजाच्या हितासाठी काम केले पाहिजे.दुर्बल आणि वंचित घटकांना मदत करण्यासाठी ते तत्पर असले पाहिजे.

7. दूरदृष्टी…

        लोकप्रतिनिधींमध्ये दूरदृष्टी असणे आवश्यक आहे.त्यांनी भविष्याचा वेध घेऊन योजना तयार केल्या पाहिजेत.देशाला आणि समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.

        या गुणांव्यतिरिक्त,एक चांगला लोकप्रतिनिधी शिक्षण,आरोग्य,पर्यावरण आणि विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणारा असावा.

          एकंदरीत भाजपाला व त्यांच्या मित्र पक्षांना लोकप्रतिनिधी कशासाठी असतात व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य काय असतात हे अजूनपर्यंत कळले नाही हे खेदाने म्हणावे लागेल.