बसपा,काँग्रेस,भाजपा,क्षेत्रीय पक्षांचे संख्याबल व पक्षबल येणार ३ डिसेंबरला पुढे.. — “लोकशाहीचे महत्व व त्यातंर्गत मुलभूत अधिकार आणि निवडणुका,मतदारांना आजच्या स्थितीत कळले काय?..

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

       राजकारण नेहमी अस्थिर असते आणि अस्थिरते अंतर्गत वेळेला अनुसरून मनात अनेक घडामोडींची वास्तविक धगधग असते.

         असाच प्रकार पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी बाबत आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला मतमोजणी अन्वये जाहीर केले जातील.

            मात्र,विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान ज्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी,पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपली शक्ती पणाला लावली त्यांना निकालाशिवाय झोप येणार नाही हे तेवढेच खरे आहे.

           मतदारांच्या मतमत्तांतरे सर्वेक्षणाला अनुसरून आकडे मोड व आकडे मोड नुसार शब्दांची फेक भारत देशात तरी बरेच उलटफेर करण्यासाठी कारणीभूत ठरत असावी असा अंदाज आहे.

         कारण,भारत देशातील मतदार हा वैचारिक परिपक्वते नुसार प्रगल्भ नाही हे स्पष्ट आहे.धर्म,जात आणि यानुसार भावना,याच्यातच मतदारांना गुरफटून ठेवण्यात राजकारणी आजही यशस्वी होत असल्याने राजकारण्यांबरोबर मतदारांनाही लोकशाहीचे महत्व व त्यातंर्गत मुलभूत अधिकार आणि निवडणुका कळलेले दिसत नाही.

            “प्रत्येक नागरिकांचे अधिकार व प्रत्येक नागरिकांचे मुलभूत अधिकार आणि राजकारण्यांच्या कार्यपद्धतीची कारकीर्द,जोपर्यंत देशातील नागरिकांना कळत नाही तोपर्यंत जात आणि धर्म त्यांच्या डोक्यातून बाहेर निघणार नाही.याचबरोबर प्रत्येक नागरिकांच्या अधिकाराला अनुसरून,लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका ह्या राज्य घटनेतंर्गत निर्देशीत लोकशाही पध्दतीने होणार नाही हेही तितकेच खरे आहे.

               महत्वाचे असे की,भारत देशातील सर्व नागरिकांना त्यांचे अधिकार व त्यांचे मुलभूत अधिकार कळले तर राजकारण्यांचा व मिडियांचा बनवाबनवीचा प्रकार सुध्दा तात्काळ उघड होईल आणि निवडणुका अंतर्गत ना जात चालणार,ना धर्म चालणार व ना बनवाबनवी चालणार!.

           “राज्य घटनेला अनुसरून राजकारण्यांनी नागरिकांच्या उन्नतीसाठी,शिक्षणासाठी,सामाजिक व आर्थिक समानतेसाठी काय केले? त्या संबंधाने आर्थिक बजेट किती रुपयांचे केलेत? व सत्तारुढ सरकारच्या कार्यकाळात नागरिकांच्या हितासाठी त्यांनी काय-काय केले आणि अपेक्षित असलेले काय काय नाही केले ?(योजना सोडून)यावरच निवडणूका पार पाडणे सुरू होईल.आताही मुद्यांवरच निवडणुका सुरू आहेत.परंतू राज्यघटना व राज्यघटना अंतर्गत नागरिकांचे महत्वपूर्ण हित-उन्नती या नुसार निवडणुकांची दिशा योग्य नाही.. 

          नागरिकांचे अधिकार व मुलभूत अधिकार,शैक्षणिक- सामाजिक व आर्थिक समानता अंतर्गत केलेले कार्य,पार पाडलेले कर्तव्य व देशातील नागरिकांची झालेली उन्नती आणि नागरिकांची केलेली सुरक्षा,या मुद्यांना अनुसरून जोपर्यंत राजकारणी निवडणूक लढवित नाही तोपर्यंत भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेली निवडणूक झाली असे म्हणता येणार नाही.

            “गरज सरो आणि वैद्य मरो,असी एक म्हण भारत देशात खूप प्रचलित आहे.या म्हणीला अनुसरून कुठल्याही राजकीय पक्षांचे कामे नकोत.

           परिवर्तन करणे व होणे हे वेगवेगळ्या विचार धारेवर आणि त्यानुसार ध्येयावर अवलंबून असते हे खरे असले तरी,१) “भारत देशातील पक्षांना कुठल्या पध्दतीचे परिवर्तन अपेक्षित आहे?.. २) पक्षांच्या विचारान्वये परिवर्तनाची परिभाषा नागरिकांच्या हिताची आहे काय?..३) पक्षातंर्गत परिवर्तनाची दिशा देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे काय?..४) पक्षांच्या परिवर्तनात समानता-बंधुभाव-न्याय-स्वातंत्र्य याला महत्त्वाचे स्थान आहे काय?.. ५) राजकीय पक्षांनी परिवर्तनात आर्थिक व सामाजिक समानतेला केंद्र बिंदू मानले आहे काय?.. ६) पक्षांच्या परिवर्तनात राजकीय व शासकीय आणि इतर नौकरी संबंधाने प्रतिनिधीत्वाला अग्रगण्य स्थान दिल्या गेले आहे काय? आणि इतर मुद्दे..

           राजकीय पक्षांचे अंधभक्त न बनता देशातील मतदारांनी प्रत्येक पक्षांच्या विचारधारेला बारकाईने समजून घेतले पाहिजे व त्यानुसारच पक्षांना महत्त्व दिले पाहिजे.तरच या देशातील नागरिकांना भारतीय राज्यघटनेला अनुसरून सर्वोत्तम लोकशाही कळलेली आहे व लोकशाही नुसार निवडणुका कळलेल्या आहेत असे म्हणता येईल.

          भारत देशातील संबंधित प्रसारण मंत्र्यांलयातंर्गत मान्यताप्राप्त मिडिया अनुदान लाटतोय.परंतू भेदभावानुसार कार्य करतो हे भारत देशातील नागरिकांसाठी चिंतेची बाब आहे.

                मात्र,नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत बसपा,भाजपा, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी व स्थानिक प्रादेशिक पक्षांनी आपापल्या परीने सर्वस्व पणाला लावून विधानसभा निवडणूक लढविली आहे.

           निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक पक्षांना अपेक्षा आहेत त्यांच्या श्रमांचे,नियोयजनांचे फलीत व्हावे..

           तद्वतच निवडणूकातंर्गत हारणे व जिंकणे हा अवघड रणसंग्राम आहे.तद्वतच प्रत्येक पक्षांच्या उमेदवारांना निवडून येणार याची शाश्वती असली किंवा नसली तरीही मतमोजणीचा दिवसच उमेदवारांचे भविष्य ठरवतो व पक्षांची ताकद पुढे आणतो आहे.

           पक्षांच्या ताकदीचे दावे व प्रतिदावे हे सत्य व असत्य मानले तरी,”ईव्हीएम मशीन, ३ डिसेंबरला निवडणुकांचे नेमके काय चित्र पुढे आणतय,यावरच प्रत्येक पक्षांचा दमखम असेल.