मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पिंपरी बुद्रुक येथील सर्व समाज बांधवांनी व सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला. — सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कॅन्डल मार्च अंतर्गत दिल्यात गगनभेदी घोषणा.. — सर्व राजकीय पुढाऱ्यांना केली गावबंदी..

बाळासाहेब सुतार

 निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

            मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पिंपरी बुद्रुक येथील सकल मराठा बांधवांनी सर्व समाज बांधवांनी पाठिंबा देऊन पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. 

          मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकाही राजकीय नेत्याला यानंतर गावामध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे ठरविण्यात आले आहे.

           मराठा समाजाचे हित बघता पिंपरी बुद्रुक येथील सर्व समाज बांधवांनी या उपोषणाला पाठिंबा दिला.गावाचे सरपंच व उपसरपंच,सर्व सदस्य व शेकडो ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा दिला. 

            सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव आक्रमक होत आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व उपोषण कर्त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

            मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत.आरक्षण मागणीसाठी पिंपरी बुद्रुक मधील मराठा बांधव राजकीय पुढाऱ्यांना गावामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे.आज सर्व समाज बांधवांनी सर्वनमूते निर्णय घेत राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश नाकारला आहे.

             सर्व सकल मराठा समाज बांधवानी गावामध्ये फेरी मारत,एक मराठा लाख मराठा,,” म्हणून जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है,आशा मोठ्या घोषणा देत कॅण्डल मार्च केला.

           मराठा आरक्षण एकच लक्ष,असा सुर सर्व राज्यांमध्ये घुमत आहे.मराठा आरक्षण मिळेपर्यंत आजी- माजी सर्व राजकीय पुढार्‍यांना प्रवेश बंदी करण्यात आलेली असून मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वपूर्ण असुन,मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक होत आसताना पहावयास मिळत आहे.