Home सांस्कृतिक जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोळ्याचा पुणे जिल्ह्यातील सराटी यथील पावन...

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोळ्याचा पुणे जिल्ह्यातील सराटी यथील पावन भुमित शेवटचा मुक्काम… — सराटी ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत. तर गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने लाखो वारकरी व भाविकांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादही देण्यात आला… — तुकारामाच्या जयघोषात लाखो भाविक भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपूर प्रतिनिधी 

        जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पावनभुमि सराटी तालुका इंदापूर येथे आगमन होताच ग्रामस्थ व कार्यकर्ते यांच्या वतीने पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. 

        पुणे जिल्ह्यात पालखी सोहळ्याचा शेवट मुक्काम असल्यामुळे लाखो भावी भक्त यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

        पालखी सोहळ्या बरोबर आलेले भाविक भक्ता व वारकरी यांना प्रत्येक घरोघरी व सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात महाप्रसाद देण्यात आला.तुकाराम तुकाराम म्हणत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

       पालखी सोहळ्यातील वाटचालीचा सर्वात मोठा टप्पा, रांगोळीच्या पायघड्या, पालखीवर पुष्पवृष्टिचा वर्षाव, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आणि पांडूरंगाच्या भेटीची ओढ लागलेला जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भक्तिचा भावसागर सराटी इंदापूर तालुक्यातील मौजे सराटी येथे मुक्कामी विसावला. इंदापूर तालूक्यात तुकाराम महाराज पालखीचा हा शेवटचा मुक्काम होता. 

         पालखी सोहळ्यासाठी शासनाचे अधिकारी पदाधिकारी ,जिल्हा पोलीस अधीक्षक,प्रांत अधिकारी,इंदापूर तहसीलदार साहेब, तालुका बांधकाम अधिकारी,तालुका पोलीस अधिकारी,आरोग्य अधिकारी, महसूल अधिकारी,तालुका पाणीपुरवठा अधिकारी,महावितरण अधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी,या सर्वच अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे चांगल्या प्रकारचे नियोजन केले असल्यामुळे कोणतीही पालखी सोहळ्याला कमतरता आलेली नाही. 

          मंगळवार 1 जुलै रोजी सकाळी 7 वाजता पालखी सराटी येथील निरा नदीत पादुकाला निरास्नान करून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. यावेळी सराटी नदीच्या पुलावर पुणे जिल्ह पोलीस बंदोबस्त संपणार आहे. तर पुढील पालखी बंदोबस्त हा सोलापूर जिल्ह्यात सुपुर्त करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज तालुका माळशिरस या ठिकाणी दाखल झाला.

        सराटीत पालखीतील पादुकाला निरा स्नान सोमवार 1 जुलै रोजी सकाळी 7 वाजता निरा नदीमध्ये तुकाराम महाराज पादुकांचे निरा स्नान संपन्न झाले. त्यानंतर पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला.