विषमता म्हणजे असमानता ,गैरबरबारी,उच्चनीचता,भेदभाव,विषाची मती.विकृती.
विकृती म्हणजे माणसाचे सहा शत्रू राग द्वेष मोह मान माया लोभ.अहंकार.अहंकारामुळे च सहा विकृती निर्माण होतात.अहंकार हा सुद्धा मेंदू ज्वर आहे.
विषमता हा मानवी मेंदूचा रोग असल्यामुळे या रोगाचा डॉक्टर हा मानसोपचार तज्ञ असतो.या डॉक्टरच्या भूमिकेतून आपण विचार केला तर या रोगाची लक्षणे कारणे आणि उपाय आपणास कळतील,सापडतील.रोग दुरुस्त करायचा म्हटले तर आधी त्याची लक्षणे कोणती ? याचा विचार करावा लागतो ,लक्षणे लक्षात आली की, कारणे शोधावी लागतात. कारणे सापडली की मग त्यांचा इलाज करता येतो.म्हणजे कारणे म्हणजे रोगांची मुळे.ती नष्ट केल्याशिवाय रोग बरा होत नाही.मुळे तशीच ठेऊन जर वरूनच बुडासकट जरी झाड कापले तरी जमिनीतून त्या कापलेल्या झाडास अजून कोंब आणि त्यातून फाटे फुटतात,त्याचे परत झाड तयार होते.असेच रोगाचे पण आहे.रोगाचे लक्षण न पाहता वरवरचा उपाय म्हणजे मलमपट्टी करीत राहिले तर रोग बरा होणार नाही.प्रथमोपचाराने व्हायरल इन्फेक्शन चे आजार बरे होतात पण मोठे रोग बरे होत नाहीत,त्यांच्यासाठी मूळ शोधून तेच नष्ट करावे लागते.
आता आपण विषमता या रोगाची लक्षणे कोणती ? त्याचे परिणाम काय ? त्याची कारणे ( मूळ ) कोणती ? आणि त्यावर इलाज ( उपाय औषध ) कोणते ? यावर विचार करू या .
1.विषमतेची लक्षणे : गरीबी श्रीमंती, जातीची उतरंड , शेतमालक शेतमजूर , कारखानदार कामगार , उद्योगपती ( कंपनी मालक आणि कर्मचारी ) , जाती जातीची उच्चनीचता आणि भेदभाव आणि अस्पृश्यता आणि बेटीबंदी.धार्मिक उन्माद,अंधश्रधा,व्यक्तिपूजा, विभूतीपूजा, अंध भक्ती , धार्मिक असमानता, आर्थिक सामाजिक राजकीय अन्याय , विचार अभिव्यक्ती आस्था उपासना याचे स्वातंत्र्य यावर आघात, दर्जा आणि संधीची कुचंबणा,क्षमता आणि कौशल्यास वाव नसणे.ही सारी लक्षणे ” विषमता ” या रोगाची दिसतात,आहेत.
2.परिणाम : जमीनदारी,भांडवलशाही,सावकारशाही,पुरोहितशाही, मठ आणि मठाधिपती,देवस्थाने,घराणेशाही त्यांची ऐश चैन आयेशा राम,मौजमजा,विमानप्रवास,24 तास एसी वास्तव्य. बार,नृत्यांगना,आणि दुसरीकडे खाण्याचे वांदे,पाण्याचे वांदे,रहाण्याचे वांदे,प्रवासाचे वांदे.शिक्षण आरोग्याची बोंबाबोंब.महागाई,बेकारी ने त्रस्त जीवन.धार्मिक लढाया,जातींची भांडणे,आरक्षणाची भांडणे,धैर्य शेताची वाटण्याची भांडणे.इत्यादी कितीतरी दुष्परिणाम या विषमतेमुळे निर्माण झालेली आहेत.
3.रोगाचे मूळ : सोटमूळ आहे स्वार्थ मोह लोभ, उप मुळ्या आहेत 1.शोषण : आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक
2 वर्चस्व : आपलेच वर्चस्व असले पाहिजे ही दुष्ट भावना.
3 श्रेष्ठत्व : मी माझे घराणे ,माझी जात हेच श्रेष्ठ आहेत.बाकी सारी घराणी जाती कनिष्ठ आहेत ही दुष्ट प्रवृती.
4 वंशत्व : माझाच वंश शुद्ध आणि पवित्र आहे,बाकी सारे अशुद्ध आणि अपवित्र आहेत ही चुकीची भावना विचार अहंकार .
5 असमानता भेदभाव ; असमान तेचे विचार आणि उच्चनीचतेची ,वरिष्ठ कनिष्ठतेची चुकीची भावना. भेदभाव ,अस्पृश्यता
वरील सहा कारणामुळे म्हणजेच ही सहा मुळे वरचेवर जमिनीत खोल रुजत असल्यामुळे याचे कारण माणसाचे चुकीचे विचार,दुष्ट भावना आणि प्रवृत्ती ,अहंकार,विकृती यामुळे या ” विषमते ” चा रोगाचा वटवृक्ष झाला. यास मुळासकट उपटून टाकणार नाही,तो पर्यंत विषमतेचा हा माणसाच्या मेंदूचा रोग नष्ट होणारच नाही.
हा रोग जोपर्यंत आहे,तोपर्यंत विषमतेची अवस्था आणि व्यवस्था ( रचना ) आणि परिणाम असणारच आहेत.
या दुष्परिणापासून मुक्ती हवी असेल तर शिका संघटित व्हा संघर्ष करा.ही विषमता अधिष्ठित व्यवस्था ( रचना ) बदलून समता अधिष्ठित समाजरचना प्रस्थापित करा.हा एकच उपाय आहे ,या वटवृक्ष समान रोग नष्ट करण्याचा.



