डॉ. हरेश गजभिये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत…

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

               गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालीत,राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.हरेश गजभिये यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर द्वारे 10 व्या वर्धापन दिना निमित्य पुरस्कार वितरण समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानीत केले.

         याबद्दल गांधी सेवा शिक्षण समितीचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. दिपक यावले,सचिव विनायकरावजी कापसे,संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल,उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड,मराठी विभाग प्रमुख डॉ. कार्तीक पाटील व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

     तद्वतच इतरेत्र सामाजिक मित्रपरिवारातील स्नेहींनी सुध्दा त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.