ब्रेकिंग न्यूज… गायवाडीत पती-पत्नीची विष प्राशन करून आत्महत्या…

युवराज डोंगरे खल्लार 

        उपसंपादक

 दर्यापूर तालुक्यातील गायवाडी गावात आपल्या राहत्या घरात पती-पत्नी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी 1 वाजता उडकीस आली आहे.

         सदर घटना गावात पसरताच मोठ्या प्रमाणात घरासमोर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 

          विलास आत्माराम पातुर्डे (वय.36), स्वाती विलास पातुर्डे (नवलकार) (वय.30) रा.गायवाडी असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नावे आहेत.

         घटनेच्यावेळी घरी कुणी नसताना विलास व स्वाती यांनी विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवली. गावातील काही नागरिकांनी दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

           दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन माहीती घेत पंचनामा केला. दर्यापूर पोलीसांनी घटनेची नोंद केली असून वुत्तलिहीस्तोवर पती-पत्नीच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीच्या पशचात 7 वर्षीय मुलगा व इतर आप्त परीवार आहे.