आपला सर्वांचा सस्नेह सविनय आभारी…

   “आदरणीय सर्व चितपरिचीत/अपरिचित स्नेही तथा सदभावक…

👇👇

      “आज माझा वाढदिवस…

वाढदिवसानिमित्त मला दिलेल्या शुभेच्छा प्रेरणादायी व उर्जापुर्ण होत्या….

             वाढदिवस म्हटले की कमी होणारे आयुष्य आणि वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांचे अनेक कर्तव्य…

            आयुष्याचा भार बऱ्याच अनुभवांनी सातत्यपूर्ण विस्तारत असतो..या भारात कधी आनंद,समाधान असते तर कधी दुःख,वेदना,समस्या,संकटे असतात…

           तद्वतच आयुष्यात कधी चारित्र्याचे हनन असते तर कधी चारित्र्याचे धिंडवडे…

           मात्र,याहीपलीकडे विश्वास व आत्मविश्वास समजून घेत अवघड मार्गाला अनुकूल करण्याची जबाबदारी ही अनुभवाची उत्तंम शिदोरी असते..

          परंतू संसाराच्या चिरकाल सत्यावर भेदक होणारा मारा सर्वांसाठी वेगवेगळ्या यशाची शिखरे असतात.या गुपितातील वेगवेगळे सुत्र कधी लवकर आयुष्य सोडवतात तर कधी उशिरा..

         मात्र,सरळ व सोपे आयुष्य जाटील जेव्हा बनतय.. तेव्हा त्या आयुष्याला समस्यांची,संकटांची, अविश्वासाची झाल्लर आपोआपच चढतय..

        अशा वेळी सर्व आप्त,स्नेही,सहकारी मित्र व कर्तव्य धुरीन स्नेही सोबत असतीलच असे नाही..

         विश्वासातील एक-एक मन तूटत जातय तेव्हा स्वतः बरोबर त्यांना सांभाळणे कठीणच असत..

           तरीही ज्यांच्या मनात दृढ आत्मविश्वास आणि दृढ आत्मबल असत,त्या व्यक्तीला सर्व बाबतीत हरवू पहाणारे,”परत्वे सहकारी बनतात..यात शांतीतील स्वयंतेचे गुणधर्म समजदारीतंर्गत मन बदलवणारे वास्तव ठरतात…  

           काळ आणि वेळ कसाही असो,समजून घेणारे व सांभाळून नेणारे मित्र,आप्त,सहकारी,असले तर यात सर्वांचा विजय असतो..सर्वांचे यशस्वी क्रमण असते..

          हरणे आणि हरवणे केवळ मैदानी किंवा इतर खेळ असतात.मात्र आयुष्याचा सारिपाट हरण्यासाठी व जिंकण्यासाठी नसतो तर यशस्वी होण्यासाठी असतो हे ओळखले पाहिजे..

        अविश्वास हे गैरसमज विस्तारनारे जनक आहे आणि अहंभाव व अहंकार उत्पन्न करणारे सकारात्मक वैरत्व आहे..

          वैरत्व जवळ येऊ देत नाही आणि समजदारीचा मार्गही खुला करीत नाही..

   ***

        यथार्थ यासाठी की,गुंतागुंतीच्या आयुष्यात आपले व परके यात कर्तव्य संकुचित झाले आहे.

         या पलीकडे जाऊन आपण वैचारिक शिध्दांताने एकत्र येत असताना,आपल्यात आवश्यक मैत्रीभाव नसेल तर ऋणानुबंध समजून घेता येत नाही व ऋणानुबंध जपता येत नाही..यामुळेच आपण अयशस्वीतेकडे वळतोय..

      — आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आप्त,स्नेही,सामाजिक चळवळीतील मित्र,सामाजिक व राजकीय चळवळीतील वरिष्ठ, धम्म बंधू,पत्रकार स्नेही व इतर वरिष्ठांकडून भरभरून शुभेच्छा दिल्या गेल्यात..

           महाराष्ट्र राज्यातून उदंड,उत्तंम,निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा तर आल्याच,पण समाजहितपोयोगी कर्तव्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भरभरून शुभेच्छा प्राप्त झाल्यात.

         यामुळे शुभेच्छान्वये जबाबदारीच्या मर्मातील अस्तित्व व निष्पक्ष,निर्भिड,स्वाभिमानातील पत्रकारितेचे,कर्म सांगून गेले..

          आपण माझ्यावर दाखवलेले प्रेम,दाखवलेली आंतरमनातील मैत्री अचूक मार्ग सांगून गेली.‌.‌

       यामुळे “मी, “आपला शतशः ऋणी आहे आणि अंतःकरणपुर्वक सहृदय आभारी आहे…

        ” धन्यवाद,!

*** 

           आपला नम्र

                 प्रदीप रामटेके

मुख्य संपादक दखल न्यूज भारत वेब पोर्टल तथा विदर्भ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई..

***