निफंद्रा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा ११ फरवरीला… — माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांची उपस्थिती…

ऋषी सहारे

   संपादक

  गडचिरोली- सावली तालुक्यातील निफंद्रा ( निमगांव ) येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम दि. ११ फरवरी २०२४ दुपारी १२ वाजता पंचशिल बौद्ध समाज मंडळ निफद्रा येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.

            कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे नागपूर हे असुन उदघाटक म्हणुन माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार ब्रम्हपुरी तर मुख्य अतिथी डॉ. राजेंद्र गवई राष्ट्रीय सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी अमरावती तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, साहित्यीक स्मिता वाकडे नागपूर, माजी जि.प. सदस्य अँड. राम मेश्राम, कांग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नामदेवराव किरसान, चंद्रपूर जिल्हा रिपाई अध्यक्ष गोपालराव रायपुरे, पिरिपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर , कांग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते , शेकाफे चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे , कांग्रेसचे संदिप भाऊ गडुमवार , काग्रेस नेते दिनेश चिटनुरवार , पुरुषोत्तम नवघडे सरपंच निफद्रा , उपसरपंच नानाजी उंदिरवाडे , यशवंत बोरकुटे माजी सभापती कृउबा सावली आदि लाभणार आहेत.

         तर पाहुणे म्हणुन मोरेश्वर चंदनखेडे रिपाई , शिधार्थ सुमन रिपाई , नितिन गोहणे कांग्रेस’ नगराध्यक्ष लता लाकडे , उषाताई भोयर महिला तालुका अध्यक्ष सावली , मनोहर गेडाम जेष्ठ नेते रिपाई , हरिष दुर्याधन पिरिपा , मुरलीधर भानारकर कार्याध्यक्ष पिरिपा , पत्रकार उदय गडकरी , पत्रकार विजय रामटेके ब्रम्हपुरी , कोमल रामटेके , एन.डी. पिंपळे ,विकास उंदिरवाडे रिपाई चंद्रपूर जिल्हा , उतम गेडाम पिरिपा सावली’ आदि लाभणार आहेत.

          ‘रात्रौ शेषराज खोब्रागडे व त्यांचा संच चंद्रपूर यांच्या भिमगीताचा कार्यक्रम होणार आहे तर त्रिशरण पंचशिला गुणवंत धम्मचारी यांचे हस्ते ग्रहण केल्या जाईल तसेच कार्यक्रमाचे संचलन रतन निमगडे व अमित वाकडे हे करणार आहेत.

          तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गुणवंत ढोलणे , विलास जनबंधु , हेमराज ढोलणे , तुलाराम उंदिरवाडे , प्रशांत ढोलणे , किशोर उंदिरवाडे , सोरते आदिनी केलेले आहे.