कोलारा गाव ग्राम विकासासाठी तिन वर्ष दत्तक घेण्यास कटिबद्ध :- अध्यक्ष सो.केदारसिंग चंदनसिंग रोटेले..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :-

           आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर आणि ग्राम पंचायत कोलारा यांचे संयुक्त विद्यमाने ग्राम विकास मतदान जागृती युवा शक्ती या संकल्पनेवर राष्ट्रीय सेवा योजना ग्रामिण समाजकार्य श्रमसंस्कार विशेष शिबिर दि.२४ जाने ते ३० जाने पर्यंत चालले,समारोपीय कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्रामविकासासाठी कोलारा हे गाव ३ वर्षासाठी शिबीर घेण्यास कटीबद्ध राहु असे प्रतिपादन डॉ. केदारसिंग रोटेले यांनी केले.

         ते पुढे म्हणाले की ग्रामाच्या विकासासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू,”सुर्य हमेशा उगता रहे,”सुर्य की रोशनी हमेशा बरकरार रहे,विद्यार्थी हमारा घडता रहे,असे सांगुन महाविद्यालय नविन-नविन कोर्सेस आणुन विद्यार्थ्यांचा विकास घडवेल.विद्यार्थी हा लोकल टु ग्लोबल जाईल याकडे पुर्ण प्रयत्न करू आणि कोलारा गावचा विकास घडवु असे अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त केले. 

           डॉ.गजानन बन्सोड म्हणाले की समाजकार्य विद्यार्थी संपूर्ण भारतभर विविध क्षेत्रात आहेत.त्यांच्या माध्यमातुन गावचा विकास साधु असे ते बालले.

         कार्यकारी प्राचार्य डॉ.विठ्ठल ठावरी कला वाणिज्य महाविद्यालय भिसी यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीर घेतल्या जाते असे सांगितले. 

          माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सिनेट सदस्य विजय घरत यांनी सांगितले की ३ वर्ष शिबीर या गावात घेण्यासाठी मी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली स्थरावर पर्यंत करेल.

            डॉ.आनंद किन्नाके वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या मार्गदर्शना नुसार ३२२ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.तर डॉ.राठोड पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम यांनी २३० गुरांची तपासणी केली,ग्राम स्वच्छता,मतदार जागृती अभियान,पथनाट्य यावर निशिकांत मेहरकुरे यांनी मार्गदर्शन केले. 

         सामुदायिक ध्यान योगा,प्रार्थना दररोज करण्याचे फायदे डॉ.दिवाकर कुमरे यांनी प्रत्याशिकाद्वारे शिबीरापर्थ्यांना करून दाखविले.

       डॉ.चंद्रभान खंगार कार्यक्रम अधिकारी रा. से.यो.यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थ सज्जनराव गेडाम,योगेश गेडाम,संतोष गेडाम,अमित उईके,यांच्या सहकार्याने सामुदायिक प्रार्थना घेतल्या जात होती.

         वनउपजापासुन उद्योगाबाबत डॉ.अजय पिसे यांनी मार्गदर्शन केले,राष्ट्रसंताचे साहित्य यावर राजु देवतळे( आजिवन प्रचारक तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य गुरूकुंज मोझरी)यांनी मार्गदर्शन केले तर प्रा.अशोकरावजी चरडे यांनी सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर मार्गदर्शन केले. 

         श्री.संजय पवार यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी यावर मनोगत व्यक्त केले.शेतीसाठी जोडव्यवसाय मधुमख्खी पालन यावर रमेश चौधी यांनी प्रात्याक्षिकाद्वारे याचे महत्व समजावुन सांगीतले,श्रमदान ग्रामस्वच्छता विद्यापिठ आपल्यादारी सर्वेक्षण तसेच दररोज सायंकाळी ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये श्री.उईके,कु.धनश्री शेडामे,मेघा गेडाम,वैष्णवी गुडघे,ऋतुजा भजभुजे तसेच सर्व शिबीरार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामधून जनप्रबोधन करण्याचे कार्य ग्रामस्थांसाठी केले. 

        प्राचार्य डॉ.शुभांगी लुंगे यांनी सात दिवसीय शिबीरात झालेली कामे याबद्दल समाधान व्यक्त करून ग्रामस्थांकडून असाच प्रतिसाद मिळाल्यास पुढील दोन वर्ष शिबीर घेण्यासाठी विचार करू असे मत मांडले.

           सदर कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ.चंद्रभान खंगारे,डॉ.दिवाकर कुमरे,डॉ. सुरेश मिममिले,डॉ.प्रिति दवे,डॉ. रागीनी मोटघरे,प्रा.हेमंत वरघने,डॉ.गजानन बन्सोड,डॉ.सुदर्शन खापर्डे,गजु सिडाम,रतिराम वांढरे,गणेश येरमे,सरपंच सौ.शोभा कोयनाडे,अंगणवाडी सेवीका इंद्रायनी रामटेके,संगीता काळयेंगे,रेखा गणविर,अविनाश गणतिर,किशोर गभणे, बहुसंख्यने ग्रामस्थ व सर्व शिबीरार्थी यांच्या उपस्थितीत ग्रामिण समाजकार्य श्रम संस्कार विशेष शिबीराचा समारोपीय कार्यक्रम पार पडला.