अभीष्ट चिंतन व गौरव सोहळा ३ फेब्रुवारीला. — पत्रकारीतेतील अनुभवांचा असणार अमुल्य क्षण..

मूल:-

       महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष,जेष्ट पत्रकार प्रा.महेश पानसे यांच्या जन्मदिनी अभीष्ट चिंतनाचे औचित्य साधून कार्यशील व्यक्तिमत्वांचा गौरव सोहळा.

दि.३ फेब्रु. २०२४ ला राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा मूल तर्फे आयोजित करण्यात आला आहे.

 

       राज्यात पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचा वाढदिवस दरवर्षी चंदपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा जिल्ह्यातील तालुका शाखांतर्फे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येत असतो.

            कृतीशील,आदम्य विश्वासी, कर्तव्यदक्ष, कर्तव्यक्षम, समजदार व जागरूक असलेल्या आणि अनेक गुणसंपन्न उत्तंम पत्रकाराचा म्हणजेच प्रा.महेश पाणसे सरांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे.

         या सोहळ्याचे महत्व लक्षात घेऊन रूग्णांना फळे वाटप करणे,वनीकरण करणे,गरीब विद्यार्थी यांना ब्लॅंकेट वाटप करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

       यासोबतच अभीष्ट चिंतन सोहळा हा कार्यशील व्यक्तिमत्वांचा गौरव करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तालूका अध्यक्ष सतिष राजूरवार व जिल्हा पदाधिकारी मनिष रक्षमवार यांनी दिली आहे. 

          या अभिष्टचिंतन सोहळ्याला तहसिलदार डॉ.रविन्द्र होळी,उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले,ठाणेदार सुमित परतेकी,प्राचार्य अशोक झाडें,जेष्ट पत्रकार बाळूभाऊ भोयर,राजुरी स्टील इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष सुमित खेमका,̊युवा सामाजिक कार्यकर्ता रुपेश पाटील यांचा सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमास विशेष उपस्थितीत राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष अनुपकुमार भार्गव, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, गडचिरोली जिल्हध्यक्ष रूपराज वाकोडे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे उपस्थित राहणार आहेत. 

        यावेळी चंदपूर जिल्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांचाही सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती चंदपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी दिली आहे. 

             सदर सोहळा एम.आय.डि.सी.परिसर मूल येथील स्टार हॉटेल येथे दुपारी २ वाजता पार पडणार आहे.