राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
वडसा (देसाईगंज)येथे आरमोरि विधान सभा क्षेत्रांचे आमदार रामदास मसराम यांची उमेद अभियानातील महिलांनी भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली. बैठकीदरम्यान महिलांनी स्वतंत्र बैठक सभागृहाची मागणी आमदारांकडे मांडली.
महिलांच्या अडचणी ऐकून आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागणीचा शासन स्तरावर पाठपुरावा करुण लवकरात लवकर सभागृह उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस मोठ्या संख्येने उमेद अभियानातील महिला उपस्थित होत्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव त्यांचे पाठीशी आहे असे मत त्यानी व्यक्त केले.



