राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
दिनांक 26 मे 2026 रोजी मलेरिया मुक्त गडचिरोली अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली येथील आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षण TCI Foundation मार्फत राबविण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली अंतर्गत एकूण 24 आशा स्वयंसेविका कार्यरत असून सर्व आशा स्वयंसेविका प्रशिक्षणासाठी उपस्थित होत्या. तसेच 2 आशा गटप्रवर्तक यांनीही प्रशिक्षणात सहभाग नोंदविला.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून डॉ. विवेक आकरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली तसेच आलम मॅडम, LSO, प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान आशा स्वयंसेविकांना मलेरिया संदर्भातील माहितीचे मूल्यमापन करण्यासाठी प्रारंभी Pre-Test घेण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर Post-Test घेण्यात आली. प्रशिक्षणाचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यात आले असून प्रशिक्षित प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण प्रभावीपणे पार पडले.
या प्रशिक्षणामध्ये मलेरिया रोगाची माहिती, मलेरियावरील उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आशा स्वयंसेविकांनी घ्यावयाची आवश्यक खबरदारी तसेच मान्सूनपूर्व तयारी कशा पद्धतीने करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच RDT Kit चा वापर कसा करावा व BS Collection कशा पद्धतीने घ्यावे यासंदर्भात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविण्यात आले.
सदर प्रशिक्षणाची सुरुवात सकाळी 11:05 वाजता झाली असून सायंकाळी 5:10 वाजता प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. सर्व उपस्थित आशा स्वयंसेविकांनी Pre-Test व Post-Test मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमास श्री. नखाते, आरोग्य सहाय्यक, प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली, सौ. इंदिरा मेश्राम LHV, प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली, हे उपस्थित होते.
एकूणच सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी उत्तम प्रकारे पार पडली असून प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.



