Home Vidarbha बाजारपेठेत नव्याने खोदकाम करू नये, प्रथम अर्धवट कामे पूर्ण करा…  —...

बाजारपेठेत नव्याने खोदकाम करू नये, प्रथम अर्धवट कामे पूर्ण करा…  — विवेक निरंकारी यांची मागणी…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

कूरखेडा – शहराचा बाजारपेठेतून सूरू राष्ट्रीय महामार्गाचे पूर्वीचेच सूरू कामे अपूर्ण असताना पून्हा नव्या बाजूने खोदकाम करण्याचा बांधकाम कंपनीचा अट्टाहास पावसाळ्यात येथील व्यापारी व नागरीकांना त्रासदायक व अडचणीत टाकणारा आहे त्यामुळे बांधकाम कंपनीने प्रथम अपूर्ण कामे पूर्ण करावे व बाजारपेठेत पावसाळ्यानंतरच नवीन खोदकाम करावे अशी मागणी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विवेक निरंकारी यानी केली आहे.

       राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी चे शहराचा बाजारपेठेतून सिमेंट क्रांकीट रस्ता व गटाराचे बांधकाम सूरू आहे मागील दोन वर्षांपासून मंदगतीने सूरू सदर रस्ता दोन पदरी पैकी एका पदरीचे काम काही प्रमाणात झाले आहे तर अद्यापही काही काम शिल्लक आहे मात्र एक बाजू पूर्ण न करताच बांधकाम कंपनी दूसर्या पदरीचे खोदकाम करण्याचा अट्टाहास करीत आहे लवकरच पावसाळ्याला सूरवात होणार आहे.

            बांधकामाची मंदगती लक्षात घेता व पावसाळा जवळच येऊन ठेपला असल्याने फक्त खोदकामच होणार आहे व पूढील बांधकाम शक्य होणार नसल्याचे मूख्य बाजारपेठेत पावसाळ्यात रस्त्यात पाणी साचत येथून मार्गक्रमण करने कठीण ठरत व्यापारी व नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने व बांधकाम कंपनीने प्रथम अपूर्ण असलेला एक पदरी मार्गाचे बांधकाम पूर्ण करावे.

      तसेच ठिकठिकाणी अपूर्ण असलेले गटाराचे बांधकाम व केबल टाकण्याकरीता अनेक ठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे बूजवावे यामुळे शहरातील पाण्याची निकासी अवरूद्ध होत पाण्याचे डबके तयार झाले आहेत यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे.

     पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होणार आहे बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच दोन वर्षांपासून सती नदीचा रखडलेल्या पूलाचा बांधकामाला गती देत पावसाळ्यापूर्वी येथील आवागमन सूनिश्चित करावे अन्यथा राष्ट्रीय महामार्ग विभाग व बांधकाम कंपनीच्या निषेध करीत येथील व्यापारी संघटना व नागरीकांचा वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सूद्धा विवेक निरंकारी यानी दिला आहे.