रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ/वर्धा
शिर्डी : छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 23 ते 26 मे 2026 दरम्यान शिर्डी तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथील भक्त निवास येथे पार पडणार आहे.
“मैत्री, विचार आणि संघर्षाची नवी वाट” या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात राज्यभरातील विद्यार्थी व युवक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शिबिरामध्ये सामाजिक प्रश्न, शिक्षण व्यवस्था, संविधान मूल्ये, संघटन कौशल्य आणि नेतृत्व विकास यावर विविध मार्गदर्शन सत्रे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शिबिराच्या माध्यमातून युवकांमध्ये सहभाग, शिक्षण आणि समता या मूल्यांची जपणूक करण्यावर भर दिला जाणार आहे. विविध विभागांतील कार्यकर्त्यांसाठी चर्चासत्र, संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अनिकेत घुले – 9130787060, सचिन काकड – 8369123163, विशाल शिंदे – 9356808387, N शेलार – 8898619823, प्रशांत खंदारे – 9503573622, सौरभ शिंपी – 9309959065, तुकाराम डोईफोडे – 8080043619, लेस्ली डीसझा – 9326164283 साहिल दरणे – 7721801496, कौस्तुभ पाचाडे – 8446471054, रोहन आदेवार – 7875380754 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राज्यभरातील युवकांमध्ये या शिबिराबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


