राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय कूरखेडा येथील विद्यान शाखेची विद्यार्थिनी मंतशा सिराजखां पठाण ही महाविद्यालयातून तृतीय स्थान प्राप्त करीत गुणवंत ठरली तिच्या यशाचे कौतूक करण्याकरीता आज दि.१५ मे रोजी शहर विचार मंच कूरखेडा यांचा वतीने तिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ तसेच पेढा भरवत सत्कार करण्यात आला व पूढील वाटचालीचा तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
मंतशा ही लोकमत चे तालुका प्रतिनिधी तथा रूग्ण कल्याण समितीचे सिराज पठाण यांची कन्या आहे.मी माझ्या दोन्ही मुलींना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देत त्यांची आवड असलेल्या क्षेत्रात करियर घडवाव हे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी,माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे नगरसेवक ॲड. उमेश वालदे, प्रा.किशोर खोपे, डॉ.प्रा.दशरथ आदे, उपसरपंच राम लांजेवार,डॉ.जगदीश बोरकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेश मेश्राम, मधूकर बोबाटे आदि हजर होते.



