राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
आदिवासी विविध कार्यकारी संस्था कुरखेडा अंतर्गत सुरू असलेल्या मका खरेदी केंद्राला आमदार रामदासजी मसराम यांनी भेट देऊन मका खरेदी प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी केंद्रावर प्रती कट्टा ५१ किलो ५२० ग्रॅम मका खरेदी सुरू असल्याचे निदर्शनास आले.ही अक्षरशः शेतकरी बांधवन्चि लूट होत आहे.
पाहणीदरम्यान आमदार रामदासजी मसराम यांनी कुरखेडा तालुक्याचे तहसीलदार जाधव यांना पाचारण करुन प्रकरण लक्षात आणुन देत तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांच्या निर्देशानुसार मका खरेदी केंद्रावर ५० किलो ५०० ग्रॅम(बारदना सह) मका खरेदी करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.
यावेळी आमदार मसराम यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत, “शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान सहन केले जाणार नाही,” असे ठामपणे सांगितले.
आमदार रामदासजी मसराम भेटीमुळे मका खरेदी प्रक्रियेला गती मिळणार असून शेतकऱ्यांचे आता पर्यंत तूट होत आहे असे भासवून मका प्रत्येकी पन्नास किलोच्या मागे १ ~१\२ किलो वजन जास्त घेत असल्याने ते त्वरीत थांबवाले त्यामूळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या प्रसंगी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकरजी तुलावी, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी सभापती गिरीधर तितराम, धनपाल मिसार सर, माजी उपसभापती श्रीराम दुगा, माजी नगरसेवक उस्मान पठाण, भावेश मुंगणकर,राकेश चव्हाण तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते..



