लक्षवेधी
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुक्यात पाण्याची तिव्र टंचाई जाणवत असल्याने जिकडे-तिकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अनेक योजना अंतर्गत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहे.तद्वतच पाणी पुरवठा अंतर्गत नळयोजनांची नवीन बांधकामे करण्यात आली आहेत व सुरु आहेत.
पण,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारातंर्गत निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली व पाईप लाईनचे अस्थाव्यस्थ अयोग्य कामे करण्यात आली.
यामुळे नळयोजनांतंर्गत बऱ्याच गावकऱ्यांना पाणी पुरवठा होणे दुरापास्त झाले आहे.याचबरोबर चिमूर तालुक्यातील बऱ्याच गावात हातपंप नादुरुस्त असल्याने पाण्याची तिव्र टंचाई जाणवत आहे.
बऱ्याच गावातील नागरिक ग्रामपंचायतीचे प्रशासक,ग्रामसेवक यांच्याकडे,पाण्याची समस्या सोडविणारी मागणी करताना दिसतात.परंतू त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.



