Home Social “महाडायलिसीस -स्वस्थ आरोग्याची हमी”या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात सात उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र दिनचे...

“महाडायलिसीस -स्वस्थ आरोग्याची हमी”या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रात सात उपजिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र दिनचे औचित्य साधून त्यामधील एक असे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण, मूत्रपिंड रुग्णांना दिलासा…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         कूरखेडा परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी”या उपक्रमा अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.

         या नव्या केंद्रामुळे कुरखेडा व आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळणार आहेत. आतापर्यंत डायलिसिससाठी दूरच्या शहरात जावे लागत असल्याने रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

        या केंद्राचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मन्त्री प्रकाश आबिटकरयांचा हस्ते ऑनलाइन पध्दतीने करण्यात आले.या वेळी गडचिरोली चे सहपालक मन्त्री आशिष जयस्वाल,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.छाया ऊईके यांनीही दुरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थीत राहुन या उपक्रमा चे कौतुक केले.व नागरिकानी या सुविधेचा अधिकाधीक लाभ घ्यावा असे आव्हहन केले.

          या प्रसंगी नगराध्यक्ष अनिता बोरकर,रुग्ण कल्याण समितीचे सिराज पठाण,जयंत हरडे,माजी रु.क.स.सदस्य विवेक निरंकारि,वैद्यवैद्यकीय अधिक्षक डॉ.अमीत ठमके, गायनीक डॉ.रणदिवे मैडम,नगर सेवक अशोक कंगाले, वैद्यकीय अधिकारी जगदीश बोरकर, क्लस्टर कोओरिनेटेररविना नांदगवळि , रोहिणी सावरकर,अभिषेक सोनी,स्नेहा टेंभर्ने,अनंत खोब्रागडे,समीक्षा कुथे,रुपेश मेश्राम सह कर्मचारी तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

        रुग्णालयात आधुनिक यंत्रसामग्रीसह प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, रुग्णांना सुरक्षित व परिणामकारक उपचार मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

         या उपक्रमामुळे परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडली असून, गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे.