Home Social प्रभाग क्र.५ मधील सौर उर्जा लघू नळ योजना दुरुस्त,नागरिकांना दिलासा… —...

प्रभाग क्र.५ मधील सौर उर्जा लघू नळ योजना दुरुस्त,नागरिकांना दिलासा… — सभापती सागर निरंकारी यांचा पूढाकार…

     राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

       कुरखेडा प्रभाग क्रमांक ५ मधील सौर उर्जेवर आधारित लघू नळ योजना मागील ५-६ महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांना पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. 

       ही बाब स्थानिक नागरिक ” किंग कोबरा फाऊंडेशन” चे आसिफ शेख यांनी नगरपंचायत स्वच्छता,वैद्यकीय व आरोग्य सभापती सागर निरंकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.

       तक्रारीची दखल घेत सागर निरंकारी यांनी तत्काळ नगर पंचायत कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.यावेळी तत्परतेने स्वत: उपस्थीत राहुन संबंधित यंत्रणेतील बिघाड दूर करून सौर उर्जा लघू नळ योजना पुन्हा सुरू करण्यात आली.

      यामुळे प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.नागरिकांनी या तातडीच्या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाचे व वैयक्तीकरित्या सभापति सागर निरंकारि यांचे आभार मानले आहेत.