Home Social जिल्हा पोलीस भरतीत पात्र ठरलेले शहरातील यूवक व यूवतीचा मुस्लिम समाजाचा वतीने...

जिल्हा पोलीस भरतीत पात्र ठरलेले शहरातील यूवक व यूवतीचा मुस्लिम समाजाचा वतीने सत्कार… 

   राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

         जिल्हा पोलीस भरतीत शहरातील मुस्लिम समाजातील एक यूवक व एक यूवती नूकतेच पात्र ठरले आहे प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची यूवती पोलीस दलात दाखल झाल्याने आज शूक्रवार रोजी दोन्ही पात्र उमेदवारांचा समाजाचा वतीने पूष्पगूच्छ शाल व भेटवस्तू देत सत्कार करण्यात आला.

        नूकतीच जिल्हा पोलीस भरतीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जाकीर शेख यांची कन्या आफरीन शेख तसेच फीरोज उर्फ पप्पू खान यांच्या मूलगा अदनान खान हे पात्र ठरले यांचा आज समाजाचा वतीने सत्कार करण्यात आला.

             मुस्लिम समाजात शिक्षणाबाबद उदासीनता आहे विषेशता मुस्लिम यूवतीत शिक्षित होत आपण शासकीय किंवा खाजगी सेवेत दाखल होत आपला भविष्य घडवू शकतो या आत्मविश्वासाचा अभाव आहे मात्र आफरीन हिचा यशाने मुस्लिम समाजातील यूवतीनाही आता बळ व प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळी समाजाचे अध्यक्ष हाजी मसूद शेख यानी व्यक्त केला.

        याप्रसंगी मुस्लिम समाज मंडळाचे उपाध्यक्ष शमीम शेख,आसिफ शेख,जियाभाई सय्यद,शहेबाज शेख,उसमान पठाण,जाकीर शेख नसीम पठाण व मुस्लिम बांधव हजर होते.