Home कृषी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मका खरेदी केंद्र सुरु करण्याच्या प्रशासनिक कार्यवाही पुर्ण करा...

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मका खरेदी केंद्र सुरु करण्याच्या प्रशासनिक कार्यवाही पुर्ण करा व केंद्र त्वरीत सुरु करा.:- आमदार रामदास मसराम यांची अधिकाऱ्यांसोबत आयोजीत महत्त्वपूर्ण बैठकित सुचना…

      राकेश चव्हाण 

 कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

         संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील व विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार रामदास मसराम यांनी देसाईगंज जनसंपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा विपणन अधिकारी बिसने व प्रादेशिक विपणन अधिकारी सावळे उपस्थित होते.

       बैठकीत संपूर्ण विधानसभेत तसेच गडचिरोली जिल्ह्यात मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य दरात विक्री करता यावी व अनावश्यक त्रास टाळावा, यासाठी अधिकाधिक खरेदी केंद्रांना प्रशासनिक मंजुरी देण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

           आमदार मसराम यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने निर्णय घेऊन मका खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास योग्य दर मिळेल व त्यांची गैरसोय टळेल, असे त्यांनी नमूद केले.

          एस डी पी ओ जिल्हा विपणन अधिकारी बिसने व एसआरएम प्रादेशिक विपणन अधिकारी सावळे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले.

          या बैठकीमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच मका खरेदी केंद्रांना मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.