Home Social बाबासाहेबांचे कार्य आकाशाला गवसणी घालणारे,नालंदा बुद्ध विहाराच्या भिमोत्सवात प्रा.डॉ.भिमराव वाघमारे यांचे प्रतिपादन…

बाबासाहेबांचे कार्य आकाशाला गवसणी घालणारे,नालंदा बुद्ध विहाराच्या भिमोत्सवात प्रा.डॉ.भिमराव वाघमारे यांचे प्रतिपादन…

युवराज डोंगरे/खल्लार 

            उपसंपादक 

         बाबासाहेबांच्या काळात माणसे गरीब होती पण “चळवळ” श्रीमंत होती. आजघडीला माणसे अर्थात समाज श्रीमंत आहे मात्र “चळवळ “ गरीब झाली. म्हणून साधने नसतांनाही बाबासाहेबांनी दिलेले लढे आठवून चळवळ श्रीमंत करावी लागेल “ असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक व प्रसिद्ध आंबेडकरी अभ्यासक डॉ. भिमराव वाघमारे यांनी केले.

          स्थानिक साईनगर स्थित नालंदा बुद्ध विहाराच्या भिम महोत्सवांतर्गत अभिवादन समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. उपमहापौर सचिन भेंडे व नालंदा बुद्ध विहार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंचाचे अध्यक्ष अध्यक्ष एकनाथ वासनिक कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून धम्ममंचावर उपस्थित होते. 

        तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातोश्री रमाईंच्या प्रतिमांना मान्यवरांनी अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. भिमराव वाघमारे यांनी उपमहापौर सचिन भेंडे यांचे प्रमुख उपस्थितीत नालंदा बुद्ध विहारावरील पंचशील ध्वजारोहण केले.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंच तथा नालंदा बुद्ध विहाराच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होमगार्ड अधिकारी राजेंद्र बनसोड, पीएचडी प्राप्त प्रा. प्रिती दुधे नंदेश्वर, गौरव साबळे, पंडित भोयर, व स्वच्छतादूत विजया खंडारे-रामचंद्र खंडारे आदींना सहपरिवार सन्मानित करण्यात आले.

         याप्रसंगी साईनगर परिवारातील सेवानिवृत्त शिक्षक पद्माकर मांडवधरे व एसटी बसचालक चंदू रामटेके यांना तसेच रवींद्र गेडाम शाल, पुष्पगुच्छ व विहाराचे सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. भिमोत्सवात सहभागी झालेले विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार यांनाही स्मृतीचिन्ह देऊन याप्रसंगी गौरविण्यात आले.

        नालंदा बुद्ध विहाराचे सचिव सुरेश दांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र चवरे यांनी, तर आभारप्रदर्शन ऍड. प्रकाश खंडारे यांनी केले. संस्थेचे कोषाध्यक्ष अरुण रामटेके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत. विहारासमोरील अशोकवाटिकेमध्ये नियोजित सभामंडपाची उभारणी केल्याबद्दल विहारातर्फे मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

    कार्यक्रमाला विनायक दुधे, भगवान इंगळे, देवा शेंडे, विलास मोहाडे, साहेबराव नाईक, चंदू रामटेके, अरुण रामटेके, पद्माकर मांडवधरे, रतन उके, सूरज मंडे, संजय रामटेके, रविंद्र गेडाम, छत्रपती पवार, सागर खंडारे, पुरुषोत्तम भटकर, प्रल्हाद इंगोले, नितीन खडसे, राजेश खंडारे, भिमराव वसुकर, किशोर रक्षे, ओमप्रकाश रामटेके, सुनिल शेंडे, जानराव वाघमारे, अवधूत शेंडे, भिमराव दंदे, सत्यवान लांजेवार, सहदेव गजभिये, गौतम गजभिये, निलेश दांडगे, नागेश खोब्रागडे, छत्रपती पवार, नाना गवई, शैलेश मोहोड, सुनील तायडे, प्रमोद मेश्राम, मनोहर दंदे, शंकर मेश्राम, भाइ सरकटे, वामनराव रामटेके, डॉ. बेले, प्रितम रामटेके, सुधाकर तलवारे, समाधान मोहोड, श्रीकृष्ण दहीकर, अरुण बडगे, अशोक खवड, डॉ. प्रदीप इंगोले, रमेश धाकडे, खुशाल मेश्राम, अनिकेत पाटील, राजेंद्र मेश्राम, सचिन हांडे, हिम्मत नागदिवे, प्रेमदास इंगळे, दिनेश चापके, हंसराज श्रीरामे, डॉ. मनिष मोहोड, राजदीप लोखंडे, अशोक मोरे, गुणवत बनसोड, मनोहर शेळके, रामचंद्र खंडारे, परमेश्वर गायकवाड, निलेश मेश्राम, प्रशांत भगेवार, डॉ. फ्रफुल वराळे, राज आंधळे, संजय पेटले, अरविंद इंदोरे, प्रशांत सापाने तसेच मातोश्री रमाई महिला मंडळाच्या रमा दंदे, वंदना चवरे, महानंदा वासनिक, इंदिरा दुधे, कुंजलता गेडाम, प्रतिभा नागदिवे, साधना नागदिवे, संगीता मंडे, सुनीता रामटेके, साधना इंगळे, पुष्पलता वसुकर, आशा मेश्राम, अनिता गवई, शीला तायडे, सुनंदा भोवते, सुजाता बडगे, ढोके ताई, कमला वासनिक, अंजली अडकणे, रेखा टेंभुरणे, सरला दांडगे, मीना पारवे, माधुरी रामटेके, तारा लिंघाटे, योगिता सरोदे, वंदना नन्नावरे, सुजाता बनसोड,विद्या खंडारे, मंदा मेश्राम, शुभांगी मोहोड,प्रीती दुधे, अर्चना वानखडे, रमा दवणे, राजकन्या खंडारे, जयमाला रामटेके, प्रभा मोहोड यांचेसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.