ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार बहाल करून दिला व जगण्याचा हक्क मिळवून दिला ते जर नसते तर आपण डॉक्टर इंजिनिअर शिक्षक बनू शकलो नसतो आपल्या जीवनाची उन्नती झाली नसती त्यामुळे बाबासाहेबांनी जे शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं व शिक्षण घेण्याचा मूलमंत्र दिला त्या शिक्षणाची कास धरून पुढील पिढीनी आपल्या जीवनाचा उद्धार करावा असे प्रतिपादन डॉ. श्रद्धा पोयाम यांनी केले.
स्थानिक गजानन नगर येथे विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमातुन अध्यस्थानावरून त्या बोलत होत्या.
विशेष अतिथी स्थानी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ मीनाक्षीताई गेडाम , प्रा. अमरदीप मेश्राम , मुखरू सुरपाम सर,सय्यद साहेब ,भाऊरावजी मेश्राम, वटी सर, खेमराज डोंगरे सर आशाताई कोलते मॅडम, बारस्कर मॅडम, संगीताताई लिंगायत मॅडम, मंगर मॅडम,अरुण मेश्राम,जितेंद्र धकाते, सितारामजी गेडाम सर ,नरेश नगरे सर आदी उपस्थित होते,आदी उपस्थित होते.
प्रा.अमरदीप मेश्राम यांनी आपल्या भाषणातून शिका संघटित व्हा व संघर्ष करा चा नारा दिला व सामाजिक जाणीव करून दिली.तर सुरपाम सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व विचाराची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज लिंगायत यांनी केले तर आभार प्रदर्शन जयद्रथ बोदेले यांनी केले.
याप्रसंगी महेश मेश्राम डोंगरे मॅडम नीताताई बोधले नागरे ताई डोंगरे ताई भारतीताई मेश्राम व समस्त गजानन नगर मधील सर्व जाती पंथाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



