Home Social SIR BLA-2 | निवडणूक आयोगाच्या SIR मॅपिंग प्रक्रियेबाबत भाजपाचे जनजागृती अभियान संपन्न….

SIR BLA-2 | निवडणूक आयोगाच्या SIR मॅपिंग प्रक्रियेबाबत भाजपाचे जनजागृती अभियान संपन्न….

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी

         निवडणूक आयोगाच्या Special Intensive Revision (SIR) मॅपिंग प्रक्रियेबाबत चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सजग करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता संत तुकाराम महाराज सभागृह,चिमूर येथे विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

         मतदार यादीत नाव सुरक्षित राहावे यासाठी ECINET App द्वारे आपले नाव २००२ च्या मतदार यादीशी जोडणे व BLO यांना आवश्यक तपशील देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.यादीतील बाहेरील नावे तसेच मृत व्यक्तींची नावे कमी करण्यासाठीही ही मोहीम राबविण्यात येत असून ceomaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.नागरिकांनी आपल्या मतदान केंद्राच्या BLO यांच्याशी तातडीने संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी.

          चिमूर तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,नेतेमंडळी व कार्यकर्ते यांच्याशीही संवाद साधण्यात आला.

         यावेळी प्रामुख्याने राजू झाडे (भाजपा तालुका समन्वयक चिमूर), गजानन गुळधे (भाजपा मंडळ तालुका अध्यक्ष, चिमूर), घनश्याम डुकरे (संचालक, बाजार समिती राज्य परिषद सहकारी संघ मर्यादित, पुणे),मनिष तुमपल्लीवार (भिसी-नेरी मंडल अध्यक्ष), गणेशजी तर्वेकर (चिमूर विधानसभा प्रमुख तथा नगरसेवक, नागभीड), एकनाथ थुटे (भाजपा तालुका अध्यक्ष, किसान आघाडी, चिमूर),प्रविण गणोरकर, कमलमामा असावा, समीर राचलवार,प्रशांत चिंडे,श्रीरंग पिसे,शैलेश शेडमाके,नीलेश गबणे,श्रेयस लाखे,अभिषेक जाजू शुभम ठाकरे,सचिन डाहुले निखील धोहिजल यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी,नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.