ऋषी सहारे
संपादक
आरमोरी –
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्र्या जयंती निमत्त दिनांक 14 एप्रिल 2026 रोज मंगळवारला स्थानक नगर परिषद कायालय,आरमोरी येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला असून त्यामीत्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाकरिता नगर परिषद आरमोरीचे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, विलास पारधी उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा समीती सभापती, राहुल तितीरमारे आरोग्य सभापती, शुभम निंबेकर बांधकाम सभापती, श्रीमती मीनाक्षीताई गेडाम महिला व बालकल्याण सभापती ,तसेच नगर सेवक पंकज खरवडे, भारत बावनथडे,अक्षय बागडे, पंधरे, अक्षय हेमके, नगर सेविका सौ.मेघाताई मने,सौ.लताताई डोकरे, सौ.वाघरे (रामटेके ) तसेच नगर परिषद कायालयातर्फे आशिष हेमके संगणक अभीयंता, श्री.काटेखाये कायालय अधीक्षक, राजू कांबळे, ज्ञानेश्वर दुमाने,योगराज दुमाने,गोपाल भोयर, श्री. पारधी, सुभाष चौधरी , गजभीये,अनंता गाढवे, मयूर मीहीकर, तसेच सुरज कारकुरवार, कुणाल शपलारे, इतर सर्व नागरीक उपस्थित होते.



