राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधि
संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती चे औचित्य साधून श्री संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार समाज राणा प्रताप वॉर्ड कुंभार मोहला तसेच आशिषभाऊ काळे मित्र मंडळी कुरखेडा यांच्यावतीने आज बुधवार ला सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन जीवन भाऊ नाट माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पार पडले.

याप्रसंगी कुंभार समाजाचे वयोवृद्ध तुकाराम बुरबादे,ऋषी कोटांगले, शेषराव ठाकरे, पुरुषोत्तम बुरबांदे, परसराम पात्रे, रामाजी किरंगे, गजानन मठ्ठे हे प्रामुख्याने उपस्थित होते. समाजाच्या तरुणांनी व त्यांच्या मित्र परिवारांनी रक्तदान शिबिरामध्ये हिरहिरीने घेऊन श्री आशिष काळे, नितेश वरवडे, भावेश मुंगणकर, लीलाधर बुरबांदे, खुशाल बनसोड, ईश्वर वझे, देवेंद्र फाये, ईश्वर ठाकरे, भूषण लाकडे, वसंता बुरबांदे, रुपेश मट्ठे, कुंदन देशमुख, देविदास देशमुख, सागर पडोळे , विनोद खंडाईत, रोहित निपाने, हेमराज नरोटे,विनोद बुरबांधे या रक्तदात्यांनी रक्तदान केलं.
याप्रसंगी वैद्यकीय चमू मध्ये माननीय डॉक्टर जगदीश बोरकर वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर अंकित बोरसरे, श्री ललित डोंबळे, श्री नयन मोहुर्ले, श्रीमती रीना गणवीर, श्री शरद बांबोडे,श्री बंडू कुंभारे ,कुमारी सपना तूरतमारे प्रयोगशाळा अधिकारी, कुमारी खुशी वझाडे प्रयोगशाळा सहाय्यक या वैद्यकीय चमुने विशेष परिश्रम घेतले.व समाजाच्या तरुणांना प्रोत्साहन देण्याकरिता मंडळाला प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाजाचे पदाधिकारी भास्कर गुंडरे, तुळशीराम बुरबंदे, रमेश पात्रे, मुरारी कोटांगले, प्रशांत कोटांगले,हेमंत पात्रे,महेश कोटांगले,हिमांशू बुरबांदे, टोमेश्वर बुरबांदे, उमेश गुंडरे कार्तिक कोटांगले, गोलू गुंडरे, जितू पात्रे, गिरधर पात्रे, नितेश पात्रे,हे प्रामुख्याने हजर होते.
विशेष मार्गदर्शक म्हणून श्री आशिष भाऊ काळे नगरसेवक तथा शिवसेना तालुका प्रमुख उबाठा गट, गजानन भोयर मानद सचिव जयगडमाता पतसंस्था कुरखेडा देविदास देशमुख, कांताबाई मट्ठे नगरसेविका,राकेश भाऊ चव्हाण, उस्मानखा पठाण, इंदुरकर सर , सिराजभाऊ पठाण, सागर निरंकारी आरोग्य व स्वच्छता सभापती,एडवोकेट उमेश वालदे नगरसेवक ,उल्हास देशमुख, भावेश मुंगणकर, मोंटू चव्हाण मोंटू चव्हाण, चांगदेव फाये यांचे विशेष सहकार्य लाभले.



