युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
14 एप्रिल हा युगपुरुष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेच्या माध्यमातून भारतीय नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार राष्ट्रीय गिता म्हणजे राज्य घटनेच्या माध्यमातुन दिला आहे.
प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे.त्यामुळेच प्रत्येक भारतीय नागरिक डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा ॠणी आहे.याचाच भाग म्हणून दि 14 एप्रिल 26 ला अखिल भारतीय मराठा महासंघ अमरावती महानगरचे वतीने माऊली पॉईंट या सभागृहात महानगरचे अध्यक्ष भानुदास पाटील बोदडे तसेच महानगरचे कार्यकारी अध्यक्ष अनिल उर्फ अण्णासाहेब धोटे यांचे मार्गदर्शनात युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरीता आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकरी व गणमान्य सभासदांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी प्रामुख्याने चांदुरी येथिल उपसरपंचा सौ. अस्मिता प्रविण शिंदे,अ.भा.मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, महासंघाचे जिल्हाकार्याध्यक्ष गणेश रेखे,विलासराव ठाकरे, टाले साहेब, कैलासराव भेंडे,विजय रायकर, धनंजय देशमुख, ओंकार राव वाघमारे,रोहण विलायतकर, राहुल मनोहर,सौ निलिमाताई, सुभाष झोंबडे, नरेंद्र ढोले, गजेंद्र पाथरे, नरेश देशमुख, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद धोटे उपस्थित होते.



