शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
मौजा शंकरपूर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सम्राट अशोक,महात्मा ज्योतिराव फुले तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दि. १२ ते १५ एप्रिल दरम्यान विविध सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.
हा चार दिवसीय उत्सव बौद्ध समाज पंच कमिटी शंकरपूर,दलित पँथर ग्रुप शंकरपूर,रमाई संघर्ष महिला मंडळ चिचाळा तसेच कुणबी व बौद्ध समाज पंचकमिटी खैरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उत्सवाची सुरुवात दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली.
दि.१३ एप्रिल रोजी अंजली गडपाळे यांच्या “ही सांज भीमाची” या विशेष कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव दिला.
दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गावातून भव्य बाईक रॅली काढून भीम जयंतीचा प्रारंभ करण्यात आला.त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले तसेच ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.
यावेळी कटान माल खरेदी संघटनेकडून उपस्थितांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.सायंकाळी ५ वाजता गाव व परिसरातील नागरिकांच्या सहभागातून भव्य धम्म रॅली काढण्यात आली,ज्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दि. १५ एप्रिल रोजी समारोप कार्यक्रमांतर्गत सकाळी भन्ते प्रियदर्शी (बोटेझरी) यांच्या धम्मदेशनेचे आयोजन करण्यात आले व त्यांच्या हस्ते पारित्राण पाठ घेण्यात आला.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य निखिलजी गायकवाड यांनी भिक्षु संघाला अष्टदान देऊन विहार बांधकामासाठी आर्थिक मदत प्रदान केली.
सायंकाळी शंकरपूर येथे भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.चार दिवस चाललेल्या या सामूहिक जयंती उत्सवाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बौद्ध पंच कमेटीचे मनोहर गायकवाड,तसेच दलित पँथर ग्रुप (उत्सव समिती) चे निखिल गायकवाड,आकाश शामकुरे,प्रथम गायकवाड,प्रवीण शेंडे,बुद्धदीप पाटील,विश्वास जणबंधू आदींनी विशेष परिश्रम घेतले.
जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन व पुष्पगुच्छ अर्पण करताना शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री.अशोक ज्ञानेश्वर चौधरी,तसेच शंकरपूर ग्रामपंचायत सदस्य श्री.निखिल गायकवाड हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,तथागत भगवान गौतम बुद्ध,यांच्याप्रति मनस्वी ऋणानुबंध जपले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनिंही मोठ्या श्रद्धेने स्मारकाला अभिवादन करून महापुरुषांच्या विचारांना वंदन केले!…



