Home Social जि.प.प्राथमिक मराठी शाळा वडूरा येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

जि.प.प्राथमिक मराठी शाळा वडूरा येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- नजिकच्या वडूरा येथे जि. प.उच्च प्राथमिक मराठी शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

         अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वनमालाताई शेवतकर,प्रमुख पाहुणे अंगणवाडी सेविका सौ.मिनाताई उंबरकर, चैतालीताई काळे, प्रतिक्षाताई हरणे उपस्थित होते.

       दिप प्रज्वलित करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील शिक्षक विजय मकेश्वर यांनी आपल्या प्रास्ताविकात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

        त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रियेत बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मकेश्वर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका मनिषा लोणकर यांनी केले.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.