Home Social ग्रा.पं. कार्यालय उपराई येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

ग्रा.पं. कार्यालय उपराई येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक 

          नजिकच्या उपराई येथिल ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

           यावेळी सरपंच निरज नागे, उपसरपंच सौ.अर्चना खंडारे, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पाचघरे,नाजूकराव मोहोड, अतुल मोहोड,अहमद अली, बाळकृष्ण खंडारे, विलास खंडारे, सूचित सुरवाडे, प्रदीप कीर्तक, शालू सुरवाडे, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.हैडेक, उपकेंद्राचे डॉ. रोहित भावसार, पंकज खंडारे, माजी सरपंच कुदरत अली, राहुल कुकटकर, अंगणवाडी सेविका अनुसया खंडारे, शुभांगी कुकटकर,देवराव सुरवाडे, भिमराव सुरवाडे, निलेश विघे आदी उपस्थित होते.