Home Political गडचिरोली जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. परिणय फुके यांचा भाजपा कुरखेडाच्या...

गडचिरोली जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. परिणय फुके यांचा भाजपा कुरखेडाच्या वतीने सत्कार..

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ.परिणय फुके यांची भारतीय जनता पार्टीच्या गडचिरोली जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा यांच्या भारतीय जनता पार्टीचे कुरखेडा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

        या प्रसंगी भारतीय जनता पार्टी आदेश आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, भंडारा-गोंदिया भाजप संघटन मंत्री बाळाभाऊ अंजनकर, भाजपा नेते मोतीराम कुकरेजा , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठानी नगर परिषदेचे उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी , भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल सचिन वानखेडे, भारतीय जनता पार्टी तालुका महामंत्री विनोद नागपूरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोनेश मेश्राम, नगरपंचायतचे कुरखेडा नगरसेवक अतुल झोडे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.