Home Social मुस्लिम समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेबाना अभिवादन व बौद्ध बांधवाना निळा धार्मिक ध्वज प्रदान… 

मुस्लिम समाजाच्या वतीने डॉ.बाबासाहेबाना अभिवादन व बौद्ध बांधवाना निळा धार्मिक ध्वज प्रदान… 

     राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधि 

         महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दि १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन कूरखेडा येथे आयोजित कार्यक्रमात मुस्लिम समाज मंडळाचा वतीने भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांचा प्रतिमेवर पूष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.

          तसेच बौद्ध बांधवाना निळा धार्मिक ध्वज सन्मानपूर्वक प्रदान करीत जयंतीच्या शुभेच्छा व मिठाईचे वितरण करण्यात आले.

              याप्रसंगी मुस्लिम समाज मंडळाचा अध्यक्ष हाजी मसूद शेख उपाध्यक्ष शमीम शेख,वलीअहेमद खान,आसिफ शेख, रियाज शेख,शहेबाज शेख, सिराज पठाण,अयुब खान,उसमान खान,समीर पठाण तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश धोंडणे माजी जि प सदस्य अशोक इंदूरकर नगरसेविका हेमलता नंदेश्वर प्रा राखी शंभरकर, प्रियंका टेभूंर्णे,हिरा वालदे, जितेंद्र वालदे, रोहित ढवळे, रमेश नंदेश्वर,स्वप्नील खोब्रागडे, राहूल खोब्रागडे,मिलींद वालदे,राजू टेभूंर्णे, नितेश खोब्रागडे, राहूल टेंभूर्णे,शांतणू खोब्रागडे तसेच बौद्ध व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येत हजर होते.