भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था संचालित जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, कर्मचारी मनोज नन्नावरे बालाजी राजगडे तसेच मोठ्या संख्येने रसेयो विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.ज्ञानेस बनसोड यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, सामाजिक समता व न्याय यावर भर देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
यावेळी काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन मनोज नन्नावरे यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली.



