प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर नगर परिषदेच्या डंम्पिग यार्डला आग लावण्यात आल्याचा संशय असल्याने,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान यांनी सदर डंम्पिंग यार्डला आग लावण्यात आली काय? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
डम्पिंग यार्ड (Dumping Yard) म्हणजे शहरातून गोळा केलेला ओला आणि सुका कचरा जिथे आणून टाकला जातो किंवा त्याची विल्हेवाट लावली जाते,अशी जागा.याला कचराभूमी किंवा लँडफिल असेही म्हणतात.
डम्पिंग यार्ड शहराचे आरोग्य राखण्यासाठी घराघरातून,रस्त्यांवरून गोळा केलेला कचरा एका सुरक्षित ठिकाणी एकत्रित करणे.
याचबरोबर डंम्पिग यार्ड अंतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया (उदा. कंपोस्टिंग) केली जाते,तर काही ठिकाणी तो फक्त ढीग लावून ठेवला जातो.
डम्पिंग यार्डमुळे दुर्गंधी,डास-माश्यांचा प्रादुर्भाव,आणि भूगर्भातील पाणी दूषित होण्याचा धोका असतो.
अयोग्य व्यवस्थापनामुळे डम्पिंग यार्डमध्ये मिथेन गॅस तयार होऊन आगी लागण्याच्या घटना घडतात,ज्यामुळे वायू प्रदूषण होते.
आधुनिक डम्पिंग यार्डमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर बायोमायनिंग (Biomining) सारख्या प्रक्रियांद्वारे विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न केले जातात,जेणेकरून पर्यावरणाचे नुकसान कमी होईल.
मात्र चिमूर नगर परिषद अंतर्गत डंम्पिंग यार्डला जाणिवपूर्वक आग लावण्यात आली असल्याचा संशय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान यांना आहे.
यामुळे आग लागण्याचे किंवा आग लावण्याचे खरे कारण काय आहे? याचे खरे उत्तर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष,मुख्याधिकारी देणार काय? हा प्रश्न जुनेद खान यांच्या डंम्पिंग यार्ड आगी मागच्या संशयाने अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.



