रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविदयालयात दिनांक०८ ते१४ एप्रील पर्यंत राष्ट्रीय सेवा योजना व विद्याथी विकास विभागाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहचे आयोजन करण्यात आले.
त्यामध्ये सविधांन उद्देशपत्रिकेची शपथ विध्यार्थ्याना देण्यात आली. तसेच महाड सत्याग्रहास१०० वर्ष झाली त्याबददल व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख डॉ. कार्तिक पाटील होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महाड सत्याग्रह मानव मुक्तीचा लढा होता.
वर्तमान काळात समाजात सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी या सत्याग्रहाची आठवण करावी लागेल. प्रमुख वक्ते म्हणून रासेयो कार्यक्रम आधिकारी डॉ प्रफुल राजुरवाडे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महाड सत्याग्रहाचा इतिहास कथन केला. महाड सत्याग्रहामुळे अनेक चळवळीला बळ मिळाले. आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. याचा वस्तू पाठ होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी डॉ.नितिन कत्रोजवार यांनी केले आभार डॉ. पितांबर पिसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.हरेश गजभिये, डॉ.लक्ष्मण कामडी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यानीकार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.



