राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील श्री भगवान महादेव देवस्थान परिसरात भारतीय जनता पार्टी कुरखेडा मंडळाच्या वतीने “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान” अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर रविवार दि. 12 एप्रिल ते सोमवार 13 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.
या नुकतेच नियोजन बैठक घेऊन शिबिराच्या व्यवस्थेसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये सह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्थळाची पाहणी केली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत नागीलवार, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख , किसान मोर्चा तालुका अध्यक्ष राकेश खुणे , ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते विवेक बुद्धे, देवानंद पाटील खुणे, गेवर्धा पंचायत समिती क्षेत्र प्रमुख नितीन कुथे,यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये उद्घाटन सत्र प्रसंगी दिनांक 12 एप्रिल ला गडचिरोली चिमूरचे माजी खासदार तथा आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री अशोकराव नेते,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णाजी गजबे,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भारतीय जनता पार्टीचे पूर्व तालुका अध्यक्ष व श्री अरततोंडी महादेव देवस्थानचे अध्यक्ष डॉ. ते.ना. बुद्धे,कुरखेडा तालुका प्रभारी जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, व भाजपा जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिराप्रसंगी वैचारिक अधिष्ठान, या विषयावर चंदाताई कोडवते पक्षाचा इतिहास व विकास, या विषयावर सदानंद कुथे कार्यविस्ताराची आमची दृष्टी, या विषयावर भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बाबुराव कोहळे कार्यपद्धती या विषयावर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर सोशल मीडिया या विषयावर चेतनजी कोलते मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 13 एप्रिल ला बूथ व्यवस्थापन, ‘मन की बात’, आगामी कार्यक्रम एस आर आय या विषयावर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, सरकारची कामगिरी या विषयावर माजी आमदार कृष्णाजी गजबे मार्गदर्शन करणार असून समारोपिय कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी, सहकार महर्षी भाजपा नेते प्रकाश पोरेडडीवार, माजी जिल्हा अध्यक्ष किशन नागदेवे,व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षण शिबिराला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष चांगदेव फाये व भारतीय जनता पार्टी चे जिल्हा तालुका पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



