शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियान अंतर्गत चिमूर येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला नागभिड तालुका आणि चिमूर तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.
श्रिहरी बालाजी मंदिर चिमूर येथे आयोजित या बैठकीत संघटन बळकटीवर विशेष भर देण्यात आला.चिमूर नागभिड तालुक्यात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला उपस्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संतोष कालकोडा,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभय छाजड,चंद्रपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे,गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नामदेवराव किरसान,चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजय गावडे पाटील,नागभिड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी,काँग्रेस नेते प्रफुल्ल खापर्डे,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गजानन बुटके,किसान सेलचे अध्यक्ष राजू कापसे,चिमूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेंद्र चट्टे,चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत डवले,काँग्रेसचे जेष्ठ नेते राम राऊत,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जुनेद खान,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजू लोणारे,किशोर शिंगरे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र चौधरी,काँग्रेस नेते सचिन गाडीवार,महिला काँग्रेसच्या नेत्या वनिता मगरे,इरफान पठाण,रवि सावसागडे,श्रिकांत गेडाम,अमोल जुनघरे,विजय घरत,विजय मेहर,विलास पिसे,स्वप्नील मालके,शांताराम सेलवटकर,मधूकर मुंगले,विवेक कापसे,नामदेव डोये,पुरुषोत्तम बघमारे,रमेश घुग्गुसकर,संजय माकोडे,नरेंद्र हेमने,नागभिड नगर परिषदचे गटनेता प्रतिक भसीन,खोजराम मरसकोल्हे,काँग्रेस नेते अमोल वानखेडे,महेश कुजेकर,शहराध्यक्ष युवक काँग्रेसचे गजानन उरकुडे,संतोष जुगनाके,संजय अमृतकर,संदीप जिवतोडे,राहुल रामटेके,संदीप सातव,सुरज चौधरी,हरीश मुळे,राजेंद्र मेश्राम,नितेश ठाकरे,नागभिड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रणया गड्डमवार,महिला शहराध्यक्षा सुनिता डोईजड,काँग्रेस नेत्या सोनाली दांडेकर,नगरसेविका आशा गायकवाड,सुनिता संदोकार,सुजाता राऊत,उषा ठाकरे,योगिता मिसार,नुरी सत्यानी अस्मिता घोडेस्वार,शमा शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



