उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित एक विद्यार्थी एक झाड व वृक्षमित्र स्पर्धा 2025 मधील विजेत्यांना महापौर सौ.संगीता खांडेकर यांच्या हस्ते आज दि. ६ एप्रिल रोजी मनपा राणी हिराई सभागृहात आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
एक विद्यार्थी एक झाड ही स्पर्धा शालेय स्तरावर तर वृक्षमित्र स्पर्धा नोंदणीकृत संस्था गट व नागरिकांचा खुले गट अश्या २ गटात घेण्यात आली होती.विजेत्यांना धनादेश रुपी रोख बक्षिसे देण्यात आली.
चंद्रपूर महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दि. १० ऑगस्ट २०२५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत,“वृक्षमित्र स्पर्धा 2025” आयोजित केली होती. या स्पर्धेत या स्पर्धेत स्थानिक अशासकीय संस्था,एनजीओ,ओपन स्पेस विकास समिती,क्लब्स,जेष्ठ नागरिक मंडळे,युवक-युवती मंडळे तसेच महिला मंडळे अश्या २५ संघांनी सहभाग नोंदविला होता.
तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता व सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने एक विद्यार्थी एक झाड स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेत सहभागी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दिले गेले व त्या झाडाचे संगोपन व संवर्धन ज्या विद्यार्थ्याने यशस्वीरीत्या केले अश्या २० शाळांच्या ४२ विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
विजेते (नोंदणीकृत संस्था गट)….
👇👇
— प्रथम क्रमांक :- शितल माता बहुउद्देशीय सेवा संस्था,चंद्रपूर – ₹ 21,000..
— द्वितीय क्रमांक : युवा वॉरियर्स ग्रुप – ₹ 15,000..
— तृतीय क्रमांक : हर्षिनी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर – ₹ 11,000…
— प्रोत्साहन पुरस्कार : नेताजी संस्था – ₹ 5,000
— संयम फाउंडेशन – ₹5,000
प्रभु फाउंडेशन – ₹ 5,000
विजेते (नागरिकांचा खुले गट)….
👇👇
— प्रथम क्रमांक : चंद्रपूर बचाव संघर्ष समिती – ₹ 21,000
— द्वितीय क्रमांक : श्री स्वामी समर्थ शिवनेरी उद्यान – ₹15,000
— तृतीय क्रमांक : गुरुबहिनी वृक्षप्रेमी ग्रुप – ₹11,000
— प्रोत्साहन पुरस्कार
सारंगी महिला बचत गट – ₹ 5,000
या प्रसंगी महापौर संगीता खांडेकर,उपमहापौर प्रशांत दानव,स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे,आयुक्त अकुनुरी नरेश,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,उपअभियंता रवींद्र कळंबे,चैतन्य चोरे,साक्षी कार्लेकर,करीना वांढरे,प्रिया खनके,परेश गहुकर तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परीक्षक म्हणुन सोनाली घनमने,प्रतिभा पेंदाम यांनी काम पहिले तर सूत्रसंचालन शिल्पा कोंडावार यांनी केले.



