राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
वडेगांव येथील क्रांतीविर नारायण सिंह उईके आदिवासी आश्रमशाळेत दूसर्या वर्गात शिकणार्या वेदांत पदा वय ८ वर्षे या विद्यार्थ्याचा शाळेजवळील तलावाचा पाण्यात बूडत मृत्यू झाला होता या घटणास्थळाला व आश्रमशाळेला दि ४ एप्रील रोजी आमदार रामदास मसराम यांनी भेट देत येथील व्यवस्थेची सोई सूविधांची पाहणी करीत उपस्थित विद्यार्था व शाळा प्रशासनाशी चर्चा केली.
पाहणी दरम्यान आश्रमशाळेत अनेक समस्या निदर्शानात आल्या या समस्या मार्गी लावत आदिवासी निवासी विद्यार्थांची सूरक्षितता सूनिश्चित करीत शाळेतील सोईसूविधा व दर्जेदार शिक्षण बाबद कोणतीच तडजोड होता कामा नये अशी सूचणा व्यवस्थापणाला केली तसेच येथूनच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांचाशी भ्रमणध्वनीवर संपर्क करीत जिल्ह्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळांचा व्यवस्थेची तपासणी करण्याची सूचना केली.
यावेळी मसराम यांनी विद्यार्थाचा शाळेलगत असलेल्या ज्या तलावात बूडत दूर्देवी मृत्यू झाला त्या तलावाची सूद्धा प्रत्येक्ष पोहचत पाहणी केली., याप्रसंगी माजी जि प उपाध्यक्ष तथा कांग्रेस तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी प स सभापती गिरीधर तितराम, ज्येष्ठ नेते आनंदराव जांभूळकर, माजी सरपंच संजय कोरेटी ,माजी नगरसेवक उसमान पठाण,भावेश मुंगनकर शाळेचे मुख्याध्यापक गिरीपूंजे आदि हजर होते.



