Home Maharashtra चंद्रपूर–गडचिरोली मार्गावर वाढली अपघातांमुळे सार्वजनिक चिंता?…  — खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची “स्टंटबाजी”!…

चंद्रपूर–गडचिरोली मार्गावर वाढली अपघातांमुळे सार्वजनिक चिंता?…  — खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची “स्टंटबाजी”!…

   लक्षवेधी

प्रा.महेश पानसे..

      चंद्रपूर ते गडचिरोली या मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची सुरू असलेली सर्रास “स्टंटबाजी” बघता भविष्यात रस्ते अपघातांमध्ये वाढ होण्याची सार्वजनिक चिंता वाढत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

        भरधाव व बेकायदेशीर प्रवासी वाहतूक हा स्टंटबाजीचाच प्रकार असून जीवघेणा ठरत असल्याचे तसे अनेक दाखले या राष्ट्रीय महामार्गावर अधून मधून बघावयास मिळतात.

       ओव्हरलोड प्रवासी घेऊन,नियम धाब्यावर बसवून,प्रवाशी पकडण्याच्या नादात भरधाव धावणाऱ्या या वाहनांमुळे इतर वाहनांनाही धोका निर्माण होत आहे.रस्ते वाहतूक सुरक्षेला अडसर ठरत आहे.या आधीही अनेक अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.अनेक निष्पाप नागरीकांना याचा फटका सहन करावा लागला आहे. 

           खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांची “स्टंटबाजी ” हा विषय केवळ रस्ते सुरक्षा,वाहतूक नियमभंगापुरता मर्यादित न राहता सार्वजनिक सुरक्षेचा अत्यंत गंभीर तेवढाच चिंतनीय विषय बनला दिसतो आहे.   

      निष्काळजीपणा मुळे अपघात होऊन जीवितहानी,भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटून अपघात होऊन जीवितहानी,ओव्हरलोडिंगमुळे वाहन असंतुलित होऊन अपघातात जीवितहानी,”स्टंटबाजी”मुळे इतर वाहनांना धडक दिल्याने साखळी अपघात होऊन निष्पाप प्रवासी व नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटनांनी प्रशासन थेट सवालाच्या घेऱ्यात येतो.

             मात्र पोलिस प्रशासन,वाहतूक विभाग आरटीओ (परिवहन विभाग) राष्ट्रीय महामार्ग यंत्रणा यांच्याकडून ठोस व कडक कारवाई झालेली का दिसत नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करताना दिसतात….

 सामाजिक संघटनांची भूमिका अस्पष्ट…..

     चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील या जीवघेण्या प्रकारावर सामाजिक संघटना व स्थानिक पदाधिकारीही मौन बाळगून असल्याने जनतेत नाराजी वाढत आहे.सुरक्षीत रस्ते वाहतुकीची जबाबदेही खाजगी ट्रॅव्हल्स युनियन ची सुद्धा आहे. 

        मात्र ‘ना हम सुधरेंगें ना सुधरले देंगे ‘,हिच भूमिका का असावी हा सवाल कायम आहे…

         संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालावे,अवैध ट्रॅव्हल्सवर विशेष मोहीम राबवून कारवाई करावी,अपघातग्रस्त प्रकरणांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत.

      प्रवासी सुरक्षेसाठी कडक नियम अंमलात आणावेत व खाजगी ट्रॅव्हल्स नाल्यांच्या “स्टंटबाजी “वर कायद्याचा दंडा फिरविणे आता सुरक्षीत रस्ते वाहतुकीसाठी अगत्याचे ठरते हे निश्चित…