इतिहास म्हणजे राजकीय इतिहास. असा समज इतिहास इतिहास लिहिणाऱ्यांचा असल्यामुळे दोन राज्याची लढाई,आणि एकमेकांचा प्रदेश आणि सैन्य जिंकून आपल्या ताब्यात घेणे,याचे वर्णन म्हणजेच इतिहास .असे शाळेत शिकविल्या जाते.हा झाला केवळ राजकीय इतिहास.
इतिहासाचे राजकीय,सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,आर्थिक असे प्रकार आहेत,परंतु इतर प्रकारचा इतिहास लिहिल्या गेला नाही.मानवी जीवनाची अशी काही अंग आहेत.परंतु केवळ राजकीय या एकाच मानवी अंगाचा इतिहास लिहिल्या गेला.इतर अंगांचा इतिहास न लिहिल्या गेल्यामुळे माणूस आणि माणसाचे जीवनाचा विकास झाला नाही.सर्वांगीण मानवी जीवनाचा इतिहास माहित झाला असता तर जीवन सुधारणे साठी त्याचा उपयोग झाला असता.
सत्ता संघर्ष आणि त्यातून होणारे परिवर्तन याची नोंद म्हणजे राजकीय इतिहास होय. परंतु सत्तासंघर्ष हा फक्त राजे महाराजे सम्राट चक्रवर्ती आणि त्यांची घराणेशाही , घराणेशाही चे संघर्ष म्हणजे राजकीय लढाया आणि या काढायची नोंद,म्हणजे कोण कुणाला कसे जिंकले ? याचे वर्णन,आनी जिंकलेले राज्य किती वर्ष टिकले,राज्याचा कारभार कसा चालला,त्या राजाने राज्याची सुव्यवस्था,संरक्षण,शांतता कशी राखली ? याचे वर्णन म्हणजेच इतिहास म्हणतो
जागतिक कीर्तीचा तत्ववेत्ता कार्ल मार्क्स याने समाजातील गरीब मध्यम श्रीमंत हे आर्थिक वर्ग त्यांच्यातील संघर्ष याची नोंद म्हणजे इतिहास असे म्हटले.यास त्याने ऐतिहासिक भौतिकवाद असे म्हटले.याचा अर्थ आर्थिक परिवर्तनासाठी झालेले संघर्ष,आर्थिक परिवर्तनासाठी सत्तासंघर्ष यास मार्क्स इतिहास म्हणतो.जमीनदार आणि शेतकरी मजूर यांच्यातील संघर्ष,कारखानदार आणि गिरणी कामगार यांच्यातील आर्थिक संघर्ष ,आणि सत्ता संघर्ष,तसेच शोषक आणि शोषित यांच्यातील सत्ता संघर्ष म्हणजेच इतिहास असे मार्क्स म्हणतो.
विषमतावादी आणि समतावादी यांच्यातील सामाजिक संघर्ष , म्हणजेच क्रांती प्रतिक्रांतीची लढाई,सत्तासंघर्ष म्हणजेच इतिहास होय,असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.
थोडक्यात,आर्थिक परिवर्तन,सामाजिक परिवर्तन,सांस्कृतिक परिवर्तन यासाठी झालेले संघर्ष ,आणि यासाठी सत्ता संघर्ष म्हणजेच इतिहास होय,असे म्हणता येईल.
घराणेशाहीच्या संघर्षातून सत्तापरिवर्तन म्हणजे एका राज्याची सत्ता जाऊन दुसऱ्याची आली,असा त्याचा अर्थ.परंतु यातून आर्थिक सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन घडून येत नाही,आणि आलेही नाही.आणि येणारही नाही.मात्र आर्थिक आणि सामाजिक संघर्षाच्या सत्तापरिवर्तन निश्चितच बदल घडून येतो,हे निर्विवाद.
जमीनदारी पद्धतीतून सरंजामशाही निर्माण झाली,त्यातून राजे राजवाडे निर्माण झाले.त्यानंतर जसजसा वैज्ञानिक शोध लागला,तसतसे तंत्रद्न्यान बदलले,तांत्रिक आणि भांडवली शेती आणि कारखाने निर्माण झाले,जमीनदार हे कारखानदार झाले.कारखानदार हे भांडवलदार झाले,यातून भांडवलदारी लोकशाही आली.याचा अर्थ ज्याच्याकडे संपती त्याचीच सत्ता असे जगाचे चित्र निर्माण झाले.संपत्तीच्या जोरावर लोकशाहीची आणि सत्ता याची खरेदी विक्री व्हायला लागली.हा खरा इतिहास आहे,जो इतिहासकारांनी लिहिलाच नाही.वर्गसंघर्ष आणि वर्गीय सत्ता,सामाजिक विषमता आणि समता यातील संघर्ष म्हणजे प्रतिक्रांती आणि क्रांती,याचे विवेचन म्हणजेच इतिहास होय,हे भांडवली इतिहासकार ,विषमतावादी इतिहासकार लिहिणारच नाहीत.लिहिलेच नाहीत,म्हणून इतिहासाचे आदन्यान दूर झाले नाही.
विषमतावादी प्रतिगामी विचाराच्या लोकांनी जो इतिहास लिहिला, त्यातून जातीयता ,धर्मांधता , आर्थिक विषमता,अंधश्रद्धा,कर्मकांड याची जोपासना करणेचेच काम केले आहे, असे दिसते.उदा. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई म्हणजे हिंदू-मुस्लीम आहात ची लढाई असे दाखवण्याचा प्रयत्न विषमतावादी इतिहासकारांनी केला आहे, खरे तर दोन राजे राजवाड्यांचे युद्ध किंवा लढाया म्हणजे दोन धर्माच्या लढाया नसतात, किंवा कधीच नव्हत्या, शिवाय शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये मुस्लिमांचे सैन्य आणि सैन्य अधिकारी होते, मुस्लिम समाजाचे लोक प्रशासनामध्ये पण होते, याचप्रमाणे औरंगजेबाच्या राज्यकारभारात हिंदूचे लोक सैन्यात होते आणि प्रशासनात पण होते, असे असतानाही, संभाजी महाराज आणि औरंगजेब म्हणजे हिंदू मुस्लिम या दोन धर्माची लढाई होय, असे सांगून दोन धर्मामध्ये द्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही पक्ष करताना दिसतात, हे सर्व सामान्य जनतेच्या लक्षात येत नाही.
खरे तर आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने इतिहासाची मांडणी केल्या गेली असती तर, निश्चितच आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडून आले असते, तसे झाले नाही म्हणूनच आज आपणास आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता दिसून येत आहे, आणि ह्या विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत. इतिहासाकडे नकारात्मक दृष्टीने न बघता सकारात्मक दृष्टीने बघण्याची गरज आहे, तसेच इतिहासाची मांडणी पण समाज परिवर्तनाच्या दृष्टीने उपयोगी पडेल अशीच करण्याची गरज आहे,



